Donald Trump Iran secret meeting Dainik Gomantak
ग्लोबल

US Iran Secret Talks: अमेरिका आणि इराण यांच्यात 3 तास सिक्रेट मीटिंग, डोनाल्ड ट्रम्प यांचा तेहरानला थेट आणि खणखणीत इशारा; म्हणाले, 'एक मार्ग विनाशाचा तर...'

US Iran Secret Talks UNGA 2026: गेल्या सात महिन्यांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात सुरु असलेल्या संघर्षामध्ये आता एक मोठी आणि सकारात्मक घडामोड समोर आली.

Manish Jadhav

US officials meet Iranian officials: गेल्या सात महिन्यांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात सुरु असलेल्या संघर्षामध्ये आता एक मोठी आणि सकारात्मक घडामोड समोर आली. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या सत्राच्या बैठकीदरम्यान अमेरिका आणि इराणच्या उच्चस्तरीय प्रतिनिधींमध्ये न्यूयॉर्क येथे तब्बल तीन तास अत्यंत महत्त्वाची गुप्त बैठक पार पडली. फेब्रुवारी महिन्यापासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरु असून हा संघर्ष संपवण्यासाठी यापूर्वी अनेकदा प्रयत्न झाले, परंतु आता पहिल्यांदाच प्रत्यक्ष चर्चेतून मोठा दिलासा मिळण्याचे संकेत मिळत आहेत.

दुसरीकडे, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेंस्की यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या बैठकीचे भरभरुन कौतुक केले असून, करार करणे पूर्णपणे इराणच्या (Iran) हिताचे असल्याचे स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितले. संभाव्य शांतता करारावर भाष्य करताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, दोन्ही देशांमधील ही बैठक अतिशय सकारात्मक वातावरणात पार पडली.

इराणने जर वेळीच योग्य पावले उचलली नाहीत, तर त्यांच्यासमोर दोनच मार्ग उरतील, ज्यातील एक मार्ग पूर्णपणे विनाशाचा, तर दुसरा महानतेचा असेल. इराण हा एक अत्यंत महान देश बनू शकतो आणि अमेरिकेची मुख्य अट हीच आहे की, कोणत्याही परिस्थितीत इराणला अणुबॉम्ब किंवा अण्वस्त्रे मिळवू दिली जाणार नाहीत, असे ट्रम्प यांनी ठणकावून सांगितले. ब्रिटनचे पंतप्रधान अँडी बर्नहॅम यांच्या भेटीनंतरही त्यांनी पुनरुच्चार केला की, इराण आमच्याशी संवाद साधण्यास उत्सुक आहे आणि दोन्ही देशांमध्ये सातत्याने चर्चा सुरु असून संबंध पुढे जात आहेत.

इराणच्या सरकारी माध्यमांच्या वृत्तानुसार, संयुक्त राष्ट्र महासभेच्या पार्श्वभूमीवर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि अमेरिकेचे विशेष दूत स्टीव विटकॉफ यांच्यात थेट आणि महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या बैठकीत इराणने सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी होर्मुज स्ट्रेट पुन्हा खुली करण्यासाठी अमेरिकेसमोर तीन मोठ्या अटी ठेवल्या आहेत. फारसच्या आखातातील नौसैनिक प्रतिबंध आणि नाकाबंदी तात्काळ उठवावी, अमेरिका व पश्चिम देशांमध्ये गोठवलेली इराणची सर्व संपत्ती ताबडतोब रिलीज करण्यात यावी आणि सर्वच आघाड्यांवरील लष्करी कारवायांना पूर्णविराम दिला जावा, अशा मागण्या इराणने केल्या आहेत.

या संपूर्ण बैठकीनंतर अमेरिकेच्या बाजूने अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया उमटली असून, विशेष दूत स्टीव विटकॉफ यांनी सध्यातरी परिस्थिती नियंत्रणात आणि उत्तम असल्याचा विश्वास व्यक्त केला. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची सध्या न्यूयॉर्कमध्ये उपस्थित असून, या उच्चस्तरीय बैठकीमुळे आगामी काळात युद्धबंदीच्या दिशेने मोठी पावले उचलली जाण्याची शक्यता बळावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket New Rules: क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! स्टंप्स उडाले तरी फलंदाज आउट होणार नाही, काय आहे नवा नियम? VIDEO

Navpancham Rajyog 2026: शनि-मंगळाच्या नवपंचम राजयोगाची कमाल! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; होणार तगडा धनलाभ

UPI MDR Charge: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, युपीआय पेमेंटवर एमडीआर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत रद्द; NPCI चा मोठा निर्णय

8th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? आयोगाच्या 5 मोठ्या अपडेट्सवर सर्वांचं लक्ष; 'फिटमेंट फॅक्टर'चं सोप्या भाषेत गणित

Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

SCROLL FOR NEXT