Iran US Tension: इराणचा महा-अल्टीमेटम! 7 अटी मान्य करा अन्यथा... तेहरानने उडवली 'महासत्ते'ची झोप; कतार-पाकिस्तानच्या मध्यस्थीने थेट मेसेज

Iran US Diplomatic Talks 7 Conditions Donald Trump: मध्य पूर्वेतील प्रचंड वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने अमेरिकेसोबतचे युद्ध संपवण्यासाठी चर्चेचे पाऊल उचलले आहे.
donald trump mojtaba khamenei
donald trump mojtaba khameneiDainik Gomantak
Published on
Updated on

Iran US Diplomatic Talks 7 Conditions Donald Trump: मध्य पूर्वेतील प्रचंड वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने अमेरिकेसोबतचे युद्ध संपवण्यासाठी चर्चेचे पाऊल उचलले आहे. इराण अमेरिकेसोबत राजनैतिक टेबलवर चर्चा करण्यास तयार झाला असला, तरी त्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर तब्बल 7 कडक अटी ठेवल्या आहेत. कतार आणि पाकिस्तानच्या माध्यमातून इराणने आपला हा संदेश आणि अटी थेट व्हाईट हाऊसपर्यंत पोहोचवल्या आहेत.

इराणच्या (Iran) सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे सचिव मोहसेन रझाई यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले की, ट्रम्प यांनी स्वतः निर्माण केलेल्या या संकटातून जर अमेरिकेला बाहेर पडायचे असेल, तर त्यांना इराणच्या या अटी मान्य कराव्याच लागतील, अन्यथा अमेरिका आणि इराणमध्ये निर्णायक व भीषण युद्ध अटळ आहे.

donald trump mojtaba khamenei
US Iran War: मध्यपूर्वेतील 7 महिन्यांचा थरार संपणार? ट्रम्प म्हणाले, 'अमेरिका-इराण युद्ध अंतिम टप्प्यात!' रक्तरंजित संघर्षानंतर अखेर टेबल टॉक्स सुरु?

इराणने ठेवलेल्या प्रमुख अटींमध्ये अमेरिकेने सर्व आघाड्यांवर इराणविरोधी लष्करी कारवाया पूर्णपणे थांबवणे, इराणचे जप्त केलेले अब्जावधी डॉलरचे फंड तात्काळ मुक्त करणे आणि समुद्रातील आर्थिक नाकेबंदी हटवणे या मुद्द्यांचा समावेश आहे. जर अमेरिकेने या अटी स्वीकारल्या तरच इराण करारावर स्वाक्षरी करेल. रझाई यांनी ट्रम्प यांच्या इशाऱ्यांना आणि धमक्यांना निरर्थक ठरवत म्हटले की, धमक्यांनी इराणला झुकवता येणार नाही.

donald trump mojtaba khamenei
America Iran War: 6 महिन्यांत 3.21 लाख कोटींची राखरांगोळी, फायटर जेट्स उद्ध्वस्त, अमेरिकन दूतावासांवर हल्ले; पेंटागनच्या ऑडिट रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

दोन्ही देशांमधील जुन्या सामंजस्य कराराची मुदत संपल्यामुळे ही नवी बोलणी सुरु करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, यावेळी अमेरिकेने हे लक्षात ठेवावे की इराणची लष्करी रणनीती आता पूर्णपणे बदलली आहे. इराणने आपल्या लष्करी ताकदीचे प्रदर्शन करत नुकतीच आखाती समुद्रात तैनात असलेल्या अमेरिकन एअरक्राफ्ट कॅरियरजवळ मल्टी-वॉरहेड अँटी-शिप क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे.

donald trump mojtaba khamenei
Iran Missile Attack: "बदला घ्याल तर उद्ध्वस्त करु!" ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा पलटवार, जॉर्डन-बहारीनमधील लष्करी तळांवर डागली क्षेपणास्त्रे

इराणचा हा दावा अमेरिकेच्या सुरक्षेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. प्रत्यक्ष व्यवहारात युद्ध सुरुच आहे, परंतु हा संघर्ष लवकर संपवण्यासाठी इराणने ही कूटनैतिक रणनीती आखली आहे. आता चेंडू पूर्णपणे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कोर्टात असून, त्यांनी शांततेचा मार्ग निवडायचा की विनाशाचा, याचा निर्णय त्यांनाच घ्यायचा आहे, असे इराणने स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com