donald trump & mojtaba khamenei  Dainik Gomantak
ग्लोबल

US Iran Peace Deal: "द डील इज कम्प्लीट!" अमेरिका आणि इराण यांच्यात ऐतिहासिक शांतता करार; 19 जून रोजी स्वित्झर्लंडमध्ये होणार अधिकृत स्वाक्षरी

US Iran Peace Aagreement Switzerland: गेल्या पाच महिन्यांपासून मध्य पूर्वेत सुरु असलेला लष्करी तणाव आणि संघर्ष संपवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल उचलले गेले.

Manish Jadhav

US Iran Peace Aagreement Switzerland: गेल्या पाच महिन्यांपासून मध्य पूर्वेत सुरु असलेला लष्करी तणाव आणि संघर्ष संपवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल उचलले गेले. अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार पूर्ण झाला असून, येत्या 19 जून रोजी स्वित्झर्लंडमध्ये या करारावर स्वाक्षरी पार पडणार असल्याची अधिकृत घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केली. या भागातील लष्करी तणाव संपवण्यासाठी सातत्याने सुरु असलेल्या राजनैतिक वाटाघाटींनंतर हे यश आल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एका पोस्टद्वारे या घडामोडींची माहिती दिली. या करारांतर्गत दोन्ही देशांनी लेबनॉनसह सर्वच आघाड्यांवरील आपल्या लष्करी कारवाया तातडीने आणि कायमच्या थांबवण्यास संमती दर्शवली. या अधिकृत स्वाक्षरी सोहळ्यापूर्वी दोन्ही देशांचे मध्यस्थ अनेक बैठका घेणार असून, त्याद्वारे तांत्रिक चर्चा आणि या कराराच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली पूर्वतयारी केली जाईल.

शरीफ यांनी अमेरिका आणि इराणच्या (Iran) सरकारांचे राजनैतिक मार्गाचा अवलंब केल्याबद्दल आभार मानले. तसेच हा करार यशस्वी करण्यासाठी कतार, सौदी अरेबिया आणि तुर्की या देशांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण मध्यस्थीच्या भूमिकेचेही कौतुक केले. अनेक महिन्यांच्या वाढत्या संघर्षानंतर या करारामुळे क्षेत्रात शांतता आणि स्थिरता प्रस्थापित होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या महत्त्वपूर्ण घोषणेनंतर अवघ्या काही वेळातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही वॉशिंग्टन आणि तेहरान दरम्यान करार पूर्ण झाल्याची पुष्टी केली. या करारांतर्गत अत्यंत धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला 'होर्मुझची सामुद्रधुनी' हा सागरी मार्ग पुन्हा खुला करण्यात येत असून युद्धादरम्यान अमेरिकेने इराणवर लादलेली नौदलाची नाकेबंदीही तातडीने हटवण्यात येत असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले. "इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणसोबतचा करार आता पूर्ण झाला. सर्वांचे अभिनंदन!" अशी पोस्ट ट्रम्प यांनी सोशल मीडियावर करत याला एक मोठा राजनैतिक विजय म्हटले.

जागतिक तेल व्यापाराचा एक मोठा हिस्सा याच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होतो, त्यामुळे ट्रम्प यांनी या मार्गावरुन कोणताही टोल न आकारता तो पूर्णपणे खुला करण्याचे आणि अमेरिकन नौदलाची नाकेबंदी त्वरित मागे घेण्याचे आदेश दिले.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दुसऱ्या एका पोस्टमध्ये या शांतता करारास ऐतिहासिक कामगिरी म्हटले असून, यामुळे संपूर्ण मध्य पूर्व भागात शांतता आणि सुरक्षा नांदेल असे म्हटले. गेल्या काही महिन्यांत हा सागरी मार्ग वॉशिंग्टन आणि तेहरानमधील संघर्षाचे मुख्य केंद्र बनला होता, ज्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली होती आणि आंतरराष्ट्रीय तेल बाजारात मोठी अस्थिरता आली होती.

आता या शांतता करारामुळे प्रादेशिक युद्धाचा धोका टळला असून, जगातील सर्वात महत्त्वाच्या ऊर्जा कॉरिडॉरमधून जहाजांची वाहतूक पूर्ववत होईल, अशी अपेक्षा आहे. स्वित्झर्लंडमधील औपचारिक स्वाक्षरी सोहळ्यापूर्वी या कराराच्या अटी आणि पुढील वाटचालीचे सविस्तर तपशील आगामी दिवसांत समोर येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT