US Strikes Iran: अमेरिकेकडून इराणवर हवाई हल्ला; ट्रम्प यांच्या न्यूक्लियर डीलच्या दाव्यादरम्यान मिडल ईस्टमध्ये पुन्हा तणाव

US Military Action Iran Coast: मिडल ईस्टमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाहीये.
US strikes Iran amid nuclear deal talks
US strikes Iran amid nuclear deal talksDainik Gomantak
Published on
Updated on

US Military Action Iran Coast: मिडल ईस्टमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाहीये. एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतची अणू कराराची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्याचा दावा केला, तर दुसरीकडे अमेरिकेने मंगळवारी पहाटे इराणवर थेट लष्करी हल्ले करुन सर्वांनाच धक्का दिला. या परस्परविरोधी घडामोडींमुळे या संपूर्ण क्षेत्रात पुन्हा एकदा युद्धाचे ढग गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

लष्कराची कारवाई आणि इराणचे नुकसान

‘एपी’ च्या रिपोर्टनुसार, अमेरिकन लष्कराने दक्षिण इराणमधील 'बंदर अब्बास' या अत्यंत महत्त्वाच्या पोर्टवर क्षेपणास्त्र लॉन्चर आणि सुरुंग पेरणाऱ्या नौकांवर मोठे हल्ले. या कारवाईत इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स' च्या नेव्ही विंगच्या दोन युद्धनौका पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या असून, त्यांचे काही जवान मारल्याचेही वृत्त आहे. अमेरिकेने ही कारवाई पूर्णपणे 'आत्मरक्षणासाठी' केल्याचे म्हटले.

US strikes Iran amid nuclear deal talks
US Israel Iran Conflict: इराण युद्धाच्या रणनीतीवरुन ट्रम्प-नेतान्याहू यांच्यात फोनवर कडाक्याचं भांडण; अमेरिकेच्या भूमिकेमुळे इस्रायल नाराज VIDEO

अमेरिकन लष्कराचे स्पष्टीकरण

अमेरिकेच्या (America) सेंट्रल कमांडचे प्रवक्ते टिमोथी हॉकिन्स यांनी या घडामोडींवर स्पष्टीकरण देताना सांगितले की, दक्षिण इराणमध्ये इराणी लष्कराकडून अमेरिकन सैन्याला थेट धोका निर्माण झाला होता. आपल्या सैनिकांचे रक्षण करण्यासाठीच हे बचावात्मक हल्ले करण्यात आले. सध्या सुरु असलेल्या युद्धविरामाच्या काळात अमेरिका अत्यंत संयम बाळगत आहे, मात्र सुरक्षेचा प्रश्न आल्यास लष्कर मागे हटणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

US strikes Iran amid nuclear deal talks
Donald Trump Iran Threat: 'लवकर निर्णय घ्या, अन्यथा काहीच उरणार नाही', ट्रम्प यांचा इराणला पुन्हा थेट आणि कडक इशारा; क्रूड ऑईलच्या किमतींमध्ये मोठी उसळी

चर्चेवर परिणाम होणार नाही?

धक्कादायक बाब म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरुन इराणच्या न्यूक्लियर प्रोग्रामवर सहमती झाल्याचे संकेत दिले असतानाच हा हल्ला झाला. असे असले तरी, अरेबियन आणि अमेरिकन मीडियाच्या मते, या लष्करी कारवाईमुळे दोन्ही देशांमधील चालू असलेल्या शांतता चर्चेवर कोणताही नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता नाही आणि कराराचे काम सुरुच राहील. मात्र, या अनपेक्षित हल्ल्यामुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com