New Iran Supreme Leader: इराणचे नवे बॉस मोजतबा खामेनेई जिवंत! पडद्यामागून हलवतायेत सूत्रे; अमेरिकन परराष्ट्र मंत्र्याचा मोठा खुलासा

Mojtaba Khamenei Alive US Intelligence: मोजतबा खामेनेई हे केवळ जिवंतच नाहीत, तर ते इराणमधील सर्व मोठ्या आणि धोरणात्मक निर्णयांमध्ये अत्यंत सक्रियपणे भूमिका बजावत आहेत, असे रुबियो यांनी स्पष्ट केले.
Mojtaba Khamenei Alive US Intelligence
Mojtaba KhameneiDainik Gomantak
Published on
Updated on

Mojtaba Khamenei Alive US Intelligence: इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्या आरोग्याबाबत आणि त्यांच्या मृत्यूबाबत आंतरराष्ट्रीय वर्तुळात सुरु असलेल्या सर्व चर्चा आणि अफवांना अखेर अमेरिकेने पूर्णविराम दिला. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी संसदेच्या परराष्ट्र संबंध समितीसमोर एक मोठे आणि अधिकृत वक्तव्य केले. मोजतबा खामेनेई हे केवळ जिवंतच नाहीत, तर ते इराणमधील सर्व मोठ्या आणि धोरणात्मक निर्णयांमध्ये अत्यंत सक्रियपणे भूमिका बजावत आहेत, असे रुबियो यांनी स्पष्ट केले.

28 फेब्रुवारी रोजी अमेरिका (America) आणि इस्रायलने इराणवर केलेल्या भीषण हल्ल्यात तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात त्यांचे सुपुत्र आणि उत्तराधिकारी मोजतबा खामेनेई यांच्याही पायाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर ते सार्वजनिक ठिकाणी दिसले नसल्याने आणि केवळ लिखित निवेदने जारी करत असल्याने त्यांच्या मृत्यूच्या अफवांना उधाण आले; परंतु अमेरिकन गुप्तचर यंत्रणेच्या हवाल्याने आता ते जिवंत असल्याची पुष्टी करण्यात आली.

Mojtaba Khamenei Alive US Intelligence
US Strikes Iran: अमेरिकेकडून इराणवर हवाई हल्ला; ट्रम्प यांच्या न्यूक्लियर डीलच्या दाव्यादरम्यान मिडल ईस्टमध्ये पुन्हा तणाव

परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी आपल्या निवेदनात असेही संकेत दिले की, अमेरिका अजूनही इराणसोबत शांतता करार करण्यास तयार आहे. हा करार आज, उद्या किंवा पुढच्या आठवड्यात कधीही होऊ शकतो, परंतु त्यासाठी इराणला अमेरिकेच्या अत्यंत कडक अटी मान्य कराव्या लागतील. या अटींमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' हा सागरी मार्ग पूर्णपणे खुला करणे आणि या मार्गावरुन जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय जहाजांवर होणारे हल्ले त्वरित थांबवणे समाविष्ट आहे. याशिवाय, इराणला आपला अणुकार्यक्रम मर्यादित करावा लागेल आणि युरेनियम संवर्धनाचे काम पूर्णपणे थांबवावे लागेल. इराणने या अटी स्वीकारल्या तरच त्यांना आर्थिक निर्बंधांमधून दिलासा दिला जाईल, असे अमेरिकेने स्पष्ट केले.

Mojtaba Khamenei Alive US Intelligence
US Israel Iran Conflict: इराण युद्धाच्या रणनीतीवरुन ट्रम्प-नेतान्याहू यांच्यात फोनवर कडाक्याचं भांडण; अमेरिकेच्या भूमिकेमुळे इस्रायल नाराज VIDEO

एकीकडे पडद्यामागे चर्चा आणि कराराच्या शक्यता वर्तवल्या जात असताना, दुसरीकडे मात्र प्रत्यक्ष युद्धभूमीवरील परिस्थिती अत्यंत स्फोटक आणि गंभीर बनली. बुधवारी पहाटे इराणच्या लष्कराने म्हणजेच आयआरजीसीने कुवेत, इराक, बहरीन आणि एरबिल येथे असलेल्या अमेरिकन लष्करी तळांवर एकामागून एक अनेक क्षेपणास्त्रे डागून भीषण हल्ले केले. अमेरिकेने इराणच्या 'केशम बेटावर' केलेल्या हल्ल्याचा हा चोख प्रत्युत्तर असल्याचा दावा आयआरजीसीच्या एरोस्पेस फोर्सने केला. या ताज्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे खाडी देशांमध्ये युद्धाचा भडका पुन्हा एकदा उडाला असून संपूर्ण परिसरात कमालीचा तणाव निर्माण झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com