US Banking Outage 2026 Dainik Gomantak
ग्लोबल

US Banking Outage 2026: मायक्रोसॉफ्टनंतर आता अमेरिकेत बँकिंग सर्व्हर डाऊन! बँक ऑफ अमेरिका आणि चेस बँकेच्या सेवा ठप; ग्राहकांमध्ये खळबळ

US Banking Outage Technical Glitch 2026: जगभरात मायक्रोसॉफ्टची सेवा विस्कळीत झाल्याची घटना ताजी असतानाच, आता अमेरिकेच्या बँकिंग क्षेत्रातून एका मोठ्या तांत्रिक बिघाडाची बातमी समोर आली.

Manish Jadhav

US Banking Outage Technical Glitch 2026: जगभरात मायक्रोसॉफ्टची सेवा विस्कळीत झाल्याची घटना ताजी असतानाच, आता अमेरिकेच्या (America) बँकिंग क्षेत्रातून एका मोठ्या तांत्रिक बिघाडाची बातमी समोर आली. अमेरिकेतील अनेक मोठ्या बँकांची ऑनलाइन सेवा अचानक कोलमडल्यामुळे लाखो ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

आउटेज ट्रॅक करणाऱ्या 'डाउनडिटेक्टर' या वेबसाईटनुसार, बँक ऑफ अमेरिका, चेस बँक, जेपी मॉर्गन, यूएस बँक, वेल्स फार्गो तसेच डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म 'जेले' या प्रमुख सेवांवर याचा परिणाम झाला. ग्राहकांना आपले बँक खाते लॉग-इन करताना, ऑनलाइन व्यवहार करताना सतत एरर मेसेजचा सामना करावा लागला.

या अचानक आलेल्या संकटामुळे नागरिकांमध्ये सायबर हल्ल्याची भीती निर्माण झाली, मात्र चेस बँकेने तातडीने स्पष्टीकरण देत हा कोणताही सायबर हल्ला नसून केवळ एक तांत्रिक बिघाड असल्याचे स्पष्ट केले. ग्राहकांचे खाते आणि पैसे पूर्णपणे सुरक्षित असून तांत्रिक टीम बिघाड दूर करण्याचे युद्धपातळीवर काम करत असल्याचे बँकेने सांगितले. या तांत्रिक समस्येमुळे अनेक युजर्सना मोबाईल ॲप आणि वेबसाईटवर सेवा उपलब्ध नसल्याचा मेसेज दिसत होता.

मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने आउटलुक आणि टीम्ससारख्या जागतिक सेवा विस्कळीत झाल्या, आणि त्यानंतर आता बँकिंग क्षेत्रातील या आउटेजमुळे डिजिटल प्रणालीच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. सर्व्हर पूर्ववत करण्याचे प्रयत्न वेगाने सुरु असून लवकरच परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather: गोव्यात पुढील 5 दिवस हवामान राहणार कोरडे! पहाटे गारवा, दुपारी उन्हाचा चटका

Goa Census: जनगणना 2027 साठी स्वयंगणना सुरू! मुख्यमंत्र्यांनी स्वतःची माहिती भरली; बनावट लिंकपासून सावध राहण्याचा इशारा

8th Pay Commission Update: आठव्या वेतन आयोगाबाबत NC-JCM चा मोठा दावा! अंमलबजावणीस उशीर झाल्यास एरियरचे नुकसान होणार का? जाणून घ्या सविस्तर

Goa Illegal Casinos: गोव्यातील अवैध कॅसिनोंविरोधात 'इनफ इज इनफ' आक्रमक! अधिकाऱ्यांविरोधात तक्रार, सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा

Goa Politics: 'तीन कोटी घेतल्याचा आरोप सिद्ध करा'; अजय खोलकरांना न्यायालयात खेचणार, वीरेश बोरकरांचा इशारा

SCROLL FOR NEXT