8th Pay Commission Update: आठव्या वेतन आयोगाबाबत NC-JCM चा मोठा दावा! अंमलबजावणीस उशीर झाल्यास एरियरचे नुकसान होणार का? जाणून घ्या सविस्तर

8th Pay Commission Latest News Today: आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा करत असलेल्या देशभरातील केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनर्ससाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली.
8th Pay Commission Latest News Today
8th Pay Commission UpdateDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

8th Pay Commission Latest News Today: आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा करत असलेल्या देशभरातील केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनर्ससाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली. या आयोगाच्या स्थापनेला आता एक वर्ष पूर्ण झाले असले, तरी नवीन वेतनमान प्रत्यक्षात कधी लागू होणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तारीख समोर आलेली नाही.

अशा परिस्थितीत, जर नवीन वेतन व्यवस्था लागू होण्यास 2027 पर्यंतचा काळ लोटला, तर 1 जानेवारी 2026 पासूनचा एरियर कर्मचाऱ्यांना मिळणार का, हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला. केंद्र सरकारच्या नियमित कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी अधिकृत असणाऱ्या 'एनसी-जेसीएम' (NC-JCM) संघटनेचे सचिव एसजी मिश्रा यांच्या मते, आयोग लागू होण्यास उशीर झाला तरी कर्मचाऱ्यांना किंवा पेन्शनर्सना कोणतेही आर्थिक नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता नाही. त्यांच्या दाव्यानुसार, नवीन वेतन आणि पेन्शनचा लाभ प्रत्येक परिस्थितीमध्ये 1 जानेवारी 2026 पासूनच मिळायला हवा, जेणेकरुन कर्मचाऱ्यांच्या हक्काचे पैसे बुडणार नाहीत.

8th Pay Commission Latest News Today
8th Pay Commission: वेतन आयोग लागू होण्यापूर्वीच झालेत रिटायर? मग जुन्या पगाराचा थकीत एरियर कसा मिळणार? जाणून घ्या नियम

मात्र, दुसरीकडे सरकारने 1 जानेवारी 2026 पासून एरियर देण्याबाबत अद्याप कोणतीही अंतिम घोषणा किंवा अधिकृत दुजोरा दिलेला नाही. मागील 7व्या वेतन आयोगाच्या वेळी, शिफारसी 1 जानेवारी 2016 पासून लागू झाल्या असल्या तरी प्रत्यक्ष पेमेंट उशिरा सुरु झाले होते, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना (Employees) एरियर मिळाला होता. परंतु, यावेळीही तसाच नियम लागू होईल का, याबाबतचा संपूर्ण अधिकार केंद्र सरकारकडेच आहे.

8th Pay Commission Latest News Today
8th Pay Commission Updates: सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा? वर्षातून दोनऐवजी 4 वेळा डीए वाढवण्याचा नवा प्रस्ताव; 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी घडामोड

न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय आयोग मे 2027 पर्यंत आपली अंतिम अहवाल सादर करु शकतो, त्यानंतरच सरकार त्यावर विचार करुन निर्णय घेईल. दरम्यान, कर्मचारी संघटनांनी 3.833 च्या फिटमेंट फॅक्टरची मागणी केली असून, जर ती मान्य झाली तर किमान मूळ वेतन 18,000 रुपयांवरुन थेट सुमारे 69,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. तसेच वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यांवरुन 6 टक्के करण्याची मागणीही करण्यात आली असून, या सर्व मागण्यांवर सरकार काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण देशातील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

DA Merger With Basic Pay 25 Percent Rule
8th Pay Commission Latest Update
8th Pay Commission 1 year Completion Updates
8th Pay Commission