Goa Weather: गोव्यात पुढील 5 दिवस हवामान राहणार कोरडे! पहाटे गारवा, दुपारी उन्हाचा चटका

Goa Weather Forecast: राज्यात मागील काही दिवसांपासून पहाटे आणि रात्री सौम्य थंडीचा गारवा, तर दुपारच्या वेळी उष्णतेचा चटका, अशी स्थिती अनुभवायला मिळत आहे.
Goa Weather Forecast
Goa WeatherDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

​पणजी: राज्यात मागील काही दिवसांपासून पहाटे आणि रात्री सौम्य थंडीचा गारवा, तर दुपारच्या वेळी उष्णतेचा चटका, अशी स्थिती अनुभवायला मिळत आहे. गोवा वेधशाळेच्या अंदाजानुसार राज्यात १७ ते २१ नोव्हेंबरदरम्यान हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे.

उत्तर गोवा, दक्षिण गोवा आणि कुशावती या सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची कोणतीही शक्यता नसून, कोणताही हवामान इशारा जारी करण्यात आलेला नाही. ​सोमवारी पणजी येथे किमान तापमान २१.३ अंश सेल्सिअस (सरासरीपेक्षा १.३ अंश कमी) तर कमाल तापमान ३२.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

Goa Weather Forecast
Goa Census: जनगणना 2027 साठी स्वयंगणना सुरू! मुख्यमंत्र्यांनी स्वतःची माहिती भरली; बनावट लिंकपासून सावध राहण्याचा इशारा

मुरगावात किमान तापमान २०.६ अंश सेल्सिअसपर्यंत (सरासरीपेक्षा ३.१ अंश कमी) घसरल्याने पहाटेचा गारवा अधिक जाणवत आहे, तर दुपारी कमाल तापमान ३३.७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने उकाडा जाणवत आहे.

दरम्यान, पणजीत आर्द्रता ६६ टक्के, तर मुरगावमध्ये ८५ टक्के इतकी नोंदवली गेली. त्यामुळे पुढील चार-पाच दिवस किमान तापमान २० ते २१ अंश दरम्यान राहण्याची शक्यता असल्याने पहाटे आणि रात्री थंडी जाणवणार आहे.

Goa Weather Forecast
Goa Illegal Casinos: गोव्यातील अवैध कॅसिनोंविरोधात 'इनफ इज इनफ' आक्रमक! अधिकाऱ्यांविरोधात तक्रार, सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.