Goa Census: जनगणना 2027 साठी स्वयंगणना सुरू! मुख्यमंत्र्यांनी स्वतःची माहिती भरली; बनावट लिंकपासून सावध राहण्याचा इशारा

Census Self Enumeration: गोव्यासाठी १६ ते ३० नोव्हेंबरदरम्यान ही प्रक्रिया राबविण्यात येत असून पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी सहभाग नोंदविला.
Census Self Enumeration
Goa Census 2027Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

साखळी: भारताची जनगणना २०२७ अंतर्गत गोव्यात सुरू झालेल्या स्वयंगणना उपक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी स्वतः सहभागी होत आपल्या कुटुंबाची आणि वैयक्तिक माहिती अधिकृत पोर्टलवर नोंदविली. राज्यातील नागरिकांनीही १६ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत स्वयंगणनेत सहभागी होऊन अचूक माहिती सादर करावी, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच जनगणनेच्या नावाखाली होणाऱ्या संभाव्य सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशाराही दिला. साखळी येथील निवासस्थानातील कार्यालयात मुख्यमंत्री सावंत यांनी se.census.gov.in या संकेतस्थळावर स्वयंगणनेची प्रक्रिया पूर्ण केली. गोव्यासाठी १६ ते ३० नोव्हेंबरदरम्यान ही प्रक्रिया राबविण्यात येत असून पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी साखळीचे निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी ईश्वर मडकईकर उपस्थित होते.

Census Self Enumeration
Goa Illegal Casinos: गोव्यातील अवैध कॅसिनोंविरोधात 'इनफ इज इनफ' आक्रमक! अधिकाऱ्यांविरोधात तक्रार, सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा

अधिकृत पोर्टलवर नोंदणी करा!

जनगणनेच्या नावाखाली सायबर फसवणुकीचे प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. स्वयंगणनेसाठी भारताची जनगणना यंत्रणेने जारी केलेला क्यूआर कोड स्कॅन करावा किंवा se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा. जनगणना करून देण्याच्या नावाखाली अनोळखी व्यक्तीने फोन केल्यास किंवा संशयास्पद लिंक पाठविल्यास त्यावर विश्वास ठेवू नये. अशा माध्यमांतून वैयक्तिक माहिती मिळवून सायबर भामटे नागरिकांची फसवणूक करू शकतात. त्यामुळे स्वतःच अधिकृत पोर्टलवर माहिती भरावी, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.