Goa Illegal Casinos: गोव्यातील अवैध कॅसिनोंविरोधात 'इनफ इज इनफ' आक्रमक! अधिकाऱ्यांविरोधात तक्रार, सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा

Illegal Casino Operations: ‘इनफ इज इनफ’चे अध्‍यक्ष गोविंद शिरोडकर, देविदास आमोणकर आणि स्‍वप्‍नेश शेर्लेकर यांनी सोमवारी पणजीत घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत बोलताना याबाबतची माहिती दिली.
Illegal Casino Operations
Goa Illegal CasinosDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: राज्‍यातील कॅसिनो बेकायदेशीररीत्‍या सुरू आहेत, असा दावा करीत ‘इनफ इज इनफ’ संघटनेने गेमिंग आयुक्त, मुख्‍य तथा गृह सचिव, क्राईम ब्रांचचे पोलिस अधीक्षक, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक तसेच पाहणी अधिकाऱ्याविरोधात दक्षता खात्‍याच्‍या भ्रष्‍टाचारविरोधी विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.

दक्षता खात्‍याने याबाबत कारवाई न केल्‍यास सर्वोच्च न्‍यायालयात जाण्‍याचा इशाराही संघटनेने दिला आहे. ‘इनफ इज इनफ’चे अध्‍यक्ष गोविंद शिरोडकर, देविदास आमोणकर आणि स्‍वप्‍नेश शेर्लेकर यांनी सोमवारी पणजीत घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत बोलताना याबाबतची माहिती दिली. ‘‘कॅसिनो हा गोव्‍याला लागलेला कलंक आहे.

Illegal Casino Operations
Goa Politics: 'तीन कोटी घेतल्याचा आरोप सिद्ध करा'; अजय खोलकरांना न्यायालयात खेचणार, वीरेश बोरकरांचा इशारा

गोव्‍यात येणाऱ्या पर्यटकांना कॅसिनो हीच गोव्‍याची संस्‍कृती असल्‍याचे वाटत आहे. कॅसिनोंमध्‍ये मनमानी कारभार असून, त्‍याला प्रशासनातील वरिष्‍ठ अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्‍याने आम्‍ही त्‍यांच्‍याविरोधात दक्षता खात्‍याच्‍या भ्रष्‍टाचारविरोधी विभागाकडे तक्रार दाखल केलेली आहे’’, असे शिरोडकर म्‍हणाले.

‘त्‍या’ नियमाकडे कानाडोळा

‘कॅसिनोंमध्‍ये केवळ पर्यटकांनाच जाता येईल. परंतु, त्‍यासाठी त्‍यांना गेमिंग आयुक्तांची परवानगी लागेल, असा नियम सरकारने तयार केला होता. परंतु, या नियमाकडे कानाडोळा करण्‍यात येत आहे. पर्यटकांसह स्‍थानिकांनाही परवानगीविनाच कॅसिनोंत प्रवेश मिळत आहे. त्‍याचा परिणाम गोमंतकीय जनतेवर होत आहे’, असे स्‍वप्‍नेश शेर्लेकर म्‍हणाले.

Illegal Casino Operations
Goa Politics: मिलिंद नाईकांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली तर पुरावे बाहेर काढणार! संकल्प आमोणकरांचा इशारा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.