Top 10 World’s Poorest Countries Dainik Gomantak
ग्लोबल

Top 10 World’s Poorest Countries: ''अन्न-पाण्याची वणवा, घालायला कपडे नाहीत...''; हे आहेत जगातील 10 गरीब देश; पाहा IMF ची लिस्ट

Top 10 World’s Poorest Countries: जगातील सर्वात नवीन आणि गरीब देश 2011 मध्ये अस्तित्वात आला. या देशातील सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) $25.83 अब्ज आहे.

Manish Jadhav

Top 10 World’s Poorest Countries:

दोन वेळचे अन्न मिळत नाही, मोडकळीस आलेली घरे, घालायचा कपडे नाहीत, नोकऱ्या नाहीत आणि पैसाही नाही, महिला आणि मुलांची अशी अवस्था पाहून तुमचही मन हेलावून जाईल. अशी स्थिती आहे जगातील सर्वात गरीब देशांची, ज्यांची यादी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) जारी केली आहे. चला तर मग जाणून घेऊया या यादीत कोणते देश समाविष्ट आहेत आणि ते इतके गरीब का आहेत?

दक्षिण सुदान (लोकसंख्या- 11,205,383)

दरम्यान, जगातील सर्वात नवीन आणि गरीब देश 2011 मध्ये अस्तित्वात आला. या देशाचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) $25.83 अब्ज आहे. हा देश सुरुवातीपासूनच आर्थिक आव्हानांचा सामना करत आहे. राजकीय अस्थिरता, अंतर्गत संघर्ष आणि मर्यादित पायाभूत सुविधा त्याच्या प्रगतीत अडथळा ठरत आहेत. या देशातील लोक पारंपारिक शेतीवर अवलंबून आहेत, परंतु या देशातील सरकार (Government) नागरिकांना मूलभूत सुविधा देऊ शकत नाही.

बुरुंडी (लोकसंख्या- 13,459,236)

जगातील दुसऱ्या क्रमांकाचा गरीब देश बुरुंडी हा पूर्व आफ्रिकेतील एक छोटासा देश आहे. आयएमएफ आणि वर्ल्ड बँक (World Bank) या दोघांनीही या देशाचे सर्वात गरीब देश म्हणून वर्णन केले आहे. त्याचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) $3.06 अब्ज आहे. येथील 90 टक्के जनता हालाखीचे जीवन जगत आहे. त्यांना दिवसातून दोन वेळचे जेवणही मिळत नाही. राजकीय अस्थिरता, सांप्रदायिक संघर्ष आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे हा देश सामाजिक-आर्थिक आव्हानांना तोंड देत आहे. येथील लोकसंख्या उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून आहे.

सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक (लोकसंख्या- 5,849,358)

सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. हा देश जगातील सर्वात गरीब देशांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे, कारण येथील लोकांना दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष करावा लागतो. या देशातील सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) $3 अब्ज आहे. राजकीय अस्थिरता, लोकांमधील संघर्ष आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे हा देश आर्थिक आव्हानांना तोंड देत आहे. युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध, पूर आणि दुष्काळ यामुळे वस्तूंच्या किमती इतक्या वाढतात की लोकांना कमाई करता येत नाही. परिणामी लोकांना उपाशी झोपावे लागते.

काँगो (लोकसंख्या- 104,354,615)

डेमॉक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो (DRC) हा उप-सहारा आफ्रिकेतील सर्वात मोठा देश आहे. जगातील सर्वात गरीब देशांच्या यादीत हा देश चौथ्या क्रमांकावर आहे. या देशातील सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) $15.42 अब्ज आहे. कोबाल्ट आणि तांब्यासारख्या नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असूनही देश आर्थिक आव्हानांना तोंड देत आहे. बहुतांश लोक गरिबीचे जीवन जगत आहेत. सुमारे 62 टक्के काँगोली रहिवासी दररोज $2.15 पेक्षा कमी कमावतात. कुपोषण, शिक्षण आणि आरोग्य सुविधांचा अभाव आहे.

मोझांबिक (लोकसंख्या- 34,497,736)

मोझांबिक हा विरळ लोकसंख्या असलेला आणि संसाधनांनी समृद्ध देश आहे. येथील सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) $23.96 अब्ज आहे, परंतु नैसर्गिक आपत्ती, रोग-महामारी, जलद लोकसंख्या वाढ, कमी कृषी उत्पादकता आणि संपत्तीची असमानता यामुळे येथील लोकांना गरिबीचा सामना करावा लागतो. संसाधन संपत्ती आणि मजबूत जीडीपी असूनही, इस्लामिक बंडखोर संघटनांच्या हल्ल्यांमुळे हा देश जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक आहे.

मलावी (लोकसंख्या- 21,390,465)

मलावी हा देश जगातील सुंदर देशांपैकी एक आहे. या देशाचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) $11.04 अब्ज आहे, परंतु आग्नेय आफ्रिकेतील हा देश आर्थिक आव्हानांशीही झुंजत आहे, कारण या देशातील लोक शेतीवर अवलंबून आहेत आणि सिंचनाचा एकमेव स्त्रोत पाऊस आहे. हवामानातील बदल आणि अन्नधान्याच्या किमतीतील चढउतारांमुळे लोकांना गरिबीचे जीवन जगण्यास भाग पाडले जाते, तर देशाचे सरकार आर्थिक विविधीकरण, शिक्षण आणि आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आणि गरिबी कमी करण्यासाठी वचनबद्ध आहे.

नायजर (लोकसंख्या- 27,844,740)

जगातील सर्वात गरीब देशांच्या यादीत पश्चिम आफ्रिकेतील नायजर देश सातव्या क्रमांकावर आहे. देशाचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) $19.54 अब्ज आहे. या देशाचा 80 टक्के भाग सहारा वाळवंटात आहे, परंतु मर्यादित नैसर्गिक संसाधने, वारंवार दुष्काळ आणि प्रामुख्याने शेतीवर अवलंबून राहणे यामुळे या देशातील लोकांना आर्थिक आव्हाने आणि गरिबीच्या उच्च पातळीचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत वाळवंटीकरण हा या देशाला सर्वात मोठा धोका आहे.

चाड (लोकसंख्या- 18,633,140)

आफ्रिकन देश चाड हा जगातील सर्वात गरीब आणि 8 वा देश आहे. देशाचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) $13.19 अब्ज आहे, परंतु भरपूर तेलाचे साठे असूनही, देशातील लोकांना आर्थिक आव्हाने आणि गरिबीच्या उच्च पातळीचा सामना करावा लागतो. या देशातील बहुतांश लोकसंख्या पावसावर अवलंबून असलेल्या शेतीवर अवलंबून आहे. मानवी हक्कांचे उल्लंघन, राजकीय विरोध आणि लोकशाही तत्त्वांचा अभाव यामुळे हा देश विकसित होऊ शकलेला नाही.

लायबेरिया (लोकसंख्या- 5,492,486)

आफ्रिकन देश लायबेरिया हा जगातील 9वा गरीब देश आहे. या देशातील सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) $4.59 अब्ज आहे, परंतु या देशाला गृहयुद्ध आणि इबोला सारख्या महामारीचा सामना करावा लागला आहे, ज्यामुळे मूलभूत सुविधांचा अभाव आहे. माजी फुटबॉल स्टार जॉर्ज वे 2018 मध्ये या देशाचे राष्ट्रपती झाले. महागाई, बेरोजगारी आणि नकारात्मक आर्थिक विकासाचे वाढते दरही ते रोखू शकले नाहीत. आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण आणि आरोग्य सुविधा देऊन या देशातील जनतेचे भविष्य सुधारण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

मादागास्कर (लोकसंख्या- 28,812,195)

आफ्रिकन देश मादागास्कर जगातील सर्वात गरीब देशांमध्ये 10 व्या क्रमांकावर आहे. या देशातील सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) $16.77 अब्ज आहे. वातावरणातील बदल आणि दुष्काळामुळे येथील लोकांना जनावरे खाऊन जगावे लागत आहे. नैसर्गिक आपत्ती आणि कुपोषणामुळे परिस्थिती बिकट आहे. युनायटेड नेशन्सच्या वर्ल्ड फूड प्रोग्राम (WFP) च्या सदस्याने येथील परिस्थिती पाहिली आणि इशारा दिला की, या देशातील लोक जास्त काळ टिकणार नाहीत. गरिबीमुळे लोक उपासमारीचे जीवन जगत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT