इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून घनघोर युद्ध सुरु आहे. आतापर्यंत 28 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर अचानक हल्ला करून अनेक लोकांचा बळी घेतला आणि मोठ्या संख्येने लोकांना ओलीस ठेवले. तेव्हापासून इस्रायलने बदला घेत गाझा पट्टीत हमासच्या हजारो दहशतवाद्यांना ठार मारले आहे.
7 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार असलेला हमास कमांडर याह्या सिनवार बेपत्ता होता. आता इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) ने एक फुटेज जारी केले आहे, ज्यात हमास कमांडर याह्या सिनवार त्याच्या कुटुंबीयांसह गाझामधील एका बोगद्यातून जात असल्याचे दाखवल्याचा दावा केला आहे.
यानंतर इस्रायलने (Israel) सिनवारला जिवंत किंवा मृत पकडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सुमारे एक मिनिटाच्या या व्हिडिओ क्लिपमध्ये दक्षिण गाझा शहरामध्ये असलेल्या बोगद्यात सिनवार त्याची पत्नी आणि तीन मुलांसह दिसत आहे. त्याचे नेतृत्व त्याचा भाऊ इब्राहिम करत होता. कमांडरची पाठ कॅमेऱ्यात दिसत असली तरी, आयडीएफचा दावा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सिनवारची ओळख पटली आहे.
दरम्यान, सिनवार वय वर्ष 61 हा हमासच्या एजेदीन अल-कसाम ब्रिगेडचे माजी कमांडर आहे आणि एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार 2017 मध्ये पॅलेस्टिनी गटाचा प्रमुख म्हणून निवडला गेला होता. 2011 मध्ये सुटका होण्यापूर्वी त्याने 23 वर्षे इस्रायली तुरुंगात घालवली होती. अलीकडेच IDF सैनिकांनी मिळवलेल्या हमासच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सिनवार स्वस्थ आणि बॅग घेऊन जाताना दिसत आहे, तर त्याच्या मुलीच्या हातामध्ये बाहुली दिसत आहे. आयडीएफचा दावा आहे की, हे फुटेज बोगद्यातून घेतले होते.
आयडीएफचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "एखाद्या व्हिडिओने फरक पडत नाही. महत्त्वाची माहिती आम्हाला हमासच्या वरिष्ठ कमांडरपर्यंत आणि ओलिसांपर्यंत पोहोचण्यात मदत करेल. सिनवारचा शोध सुरु आहे. जोपर्यंत आम्ही त्याला मृत किंवा जिवंत पकडत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही."
हगारी यांनी असाही दावा केला की, या महिन्याच्या सुरुवातीला इस्रायली सैन्याने सिनवारसह अनेक हमास लष्करी कमांडरच्या जवळच्या नातेवाईकांना ताब्यात घेतले होते. पकडलेल्यांमध्ये हमासच्या (Hamas) रफाह ब्रिगेडचा कमांडर राफा सलामेह याच्या वडिलांचा समावेश आहे. त्याचबरोबर आणखी एक वरिष्ठ हमास कमांडर, होस्नी हमदान याचा मुलगा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.