Israel-Hamas War: कतारची मध्यस्थी फेल! इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम होऊ शकला नाही...

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं भीषण युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. हे युद्ध तात्काळ थांबावे यासाठी कतार सातत्याने प्रयत्न करत आहे.
Israel-Hamas War
Israel-Hamas WarDainik Gomantak
Published on
Updated on

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं भीषण युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. हे युद्ध तात्काळ थांबावे यासाठी कतार सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र आता, कतारची मध्यस्थी उपयुक्त ठरली नाही. गाझामध्ये युद्धविराम करण्याचे कतारचे प्रयत्न अयशस्वी झाले आहेत. युद्ध थांबण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या कतारने म्हटले की, सध्या या दिशेने कोणतीही लक्षणीय प्रगती झालेली नाही. कतारचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आरोप केला आहे की हमास त्याच्या 'बेतुका मागण्या'वर ठाम आहे.

दरम्यान, कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल थानी यांनी म्युनिक सुरक्षा परिषदेला संबोधित करताना "मानवतावादी पैलू" शी संबंधित समस्यांचा उल्लेख केला. 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यादरम्यान हमासने पकडलेल्या ओलीसांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी नेतन्याहू यांच्यावर प्रचंड दबाव आहे. नेतन्याहू म्हणाले की, त्यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्या सांगण्यावरुन एक शिष्टमंडळ कैरोला पाठवले होते परंतु ते पुन्हा पाठवण्यात त्यांना काही अर्थ दिसत नाही. हमासला गाझा आणि इस्रायलमध्ये कायमस्वरुपी युद्धविराम हवा आहे आणि आपल्या तुरुंगात बंद असलेल्या सर्व पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका व्हावी.

Israel-Hamas War
Israel-Hamas War: चवताळलेल्या इस्रायली लष्कराचा हॉस्पिटलवर हल्ला; एका रुग्णाचा मृत्यू, 6 हून अधिक जण जखमी

नेतन्याहू म्हणाले - कोणत्याही परिस्थितीत हल्ले थांबणार नाही

दुसरीकडे, नेतन्याहू यांनी इजिप्तच्या गाझा सीमेवरील रफाह शहरावरील जमिनीवर हल्ले थांबवण्याच्या आंतरराष्ट्रीय विनंतीकडेही दुर्लक्ष केले. ते कोणत्याही परिस्थितीत हल्ले थांबवण्याच्या बाजूने नाहीत. हमासवरील "संपूर्ण विजयासाठी" हल्ले आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

असोसिएटेड प्रेस पत्रकार आणि रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्य गाझामध्ये झालेल्या हवाई हल्ल्यांमध्ये मुलांसह 40 हून अधिक लोक ठार झाले आणि किमान 50 जण जखमी झाले. इस्रायलच्या लष्कराने हमासवर हल्ले केल्याचे सांगितले. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, गाझामध्ये आतापर्यंत 28,858 लोक मारले गेले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com