ICJ|South Africa|Israel|Hamas Dainik Gomantak
ग्लोबल

गाझा हत्याकांडावर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला निकाल, इस्रायलला दिलेल्या आदेशात काय म्हटले?

Israel Hamsa War: सध्या जगात चार देशांत युद्ध सुरू आहे. रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास यांच्यातील युद्धामुळे सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान होत आहे.

Ashutosh Masgaunde

The International Court of Justice ruled on South Africa's petition that the Israeli government must stop its forces from carrying out genocide against Palestinians in Gaza:

सध्या जगात चार देशांत युद्ध सुरू आहे. रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास यांच्यातील युद्धामुळे सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान होत आहे.

दरम्यान, गाझा पट्टीमध्ये इस्रायली सैन्याने केलेल्या नरसंहाराचे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात पोहोचले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वोच्च आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (ICJ) नुकताच या प्रकरणी निकाल दिला.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दक्षिण आफ्रिकेच्या याचिकेवर निकाल देताना म्हटले आहे की, इस्रायल सरकारने गाझामधील पॅलेस्टिनी लोकांविरुद्ध नरसंहार करण्यापासून आपल्या सैन्याला थांबवावे. इस्रायलने नरसंहार कराराच्या अनुच्छेद २ च्या चौकटीत आपली शक्ती वापरली पाहिजे. मात्र, यावेळी न्यायालयाने युद्धबंदीचे आदेश दिले नाहीत.

ICJ ने इस्रायलला गाझामधील मानवतावादी शोकांतिका थांबवण्याचे आणि अशा कारवायांमध्ये सहभागी असलेल्यांना शिक्षा करण्याचे आवाहन केले.

ते म्हणाले की, गाझा पट्टीतील सामान्य नागरिकांचे हाल आणि त्यांच्या जीवितहानीबद्दल न्यायालयाला काळजी आहे. इस्त्रायलने आपली नरसंहाराची कृत्ये थांबवण्यासाठी योग्य पावले उचलली पाहिजेत असे ते म्हणाले.

दक्षिण आफ्रिकेने ICJ मध्ये गाझा पट्टीत इस्रायलकडून करण्यात येत असलेल्या लष्करी कारवाईला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती, ती आंतरराष्ट्रीय न्यायालयाने मान्य केली नाही.

न्यायालयाने इस्रायलला युद्धविराम करण्याचे आदेश दिले नाहीत. यावर इस्रायलने नरसंहाराचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आणि हे आरोप रद्द करण्याची मागणीही सीजेआयकडे केली आहे. इस्त्रायलच्या हल्ल्यामुळे आतापर्यंत पॅलेस्टाईनमधील २६,००० हून अधिक लोक मारले गेल्याचा दावा केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT