NZ vs PAK: पाकिस्तानने टाळला व्हाइटवॉश, भारत-ऑस्ट्रेलियाचा विक्रमही मोडला; पण न्यूझीलंडने जिंकली मालिका

New Zealand vs Pakistan: पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्ध पाचवा टी20 सामना जिंकत मालिकेत व्हाइटवॉश टाळला आहे.
New Zealand vs Pakistan
New Zealand vs PakistanX/TheRealPCB and BLACKCAPS
Published on
Updated on

New Zealand vs Pakistan, T20I Series:

पाकिस्तानचा क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर होता. या दौऱ्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघात 5 सामन्यांची टी20 मालिका झाली. या मालिकेतील अखेरचा सामना रविवारी (21 जानेवारी) झाला. या सामन्यात पाकिस्तानने 42 धावांनी विजय मिळवला.

या विजयासह पाकिस्तानने व्हाइटवॉश टाळला असला, तरी न्यूझीलंडने या मालिकेतील पहिले चारही सामने जिंकले असल्याने मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली.

पाचव्या टी20 सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 135 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघ 17.2 षटकात 92 धावांवरच सर्वबाद झाला.

New Zealand vs Pakistan
NZ vs PAK: पाकिस्तानची उडाली दाणादाण! शाहीन आफ्रिदीचं नेतृत्व फेल; न्यूझीलंडविरुद्ध सलग चौथा सामना गमावला

न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 26 धावा केल्या. तसेच फिन ऍलेनने 22 धावा केल्या, तर फिल सिफर्टने 19 धावा केल्या. या तिघांव्यतिरिक्त केवळ विल यंगलाच 10 धावांचा टप्पा पार करता आला. त्याने 12 धावा केल्या.

पाकिस्तानाकडून इफ्तिखर अहमदने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तसेच कर्णधार शाहिन आफ्रिदी आणि मोहम्मद नवाझ यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर झमान खान आणि उसमा मीर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, या सामन्यात प्रथम फलंदाजी केलेल्या पाकिस्तान संघाकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 38 धावा केल्या. फखर जमानने 33 धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त कोणालाही 20 धावांचा टप्पा पार करता आल्या नाही.

New Zealand vs Pakistan
NZ vs PAK: न्यूझीलंड संघात रचिन रविंद्रची एन्ट्री! पाकिस्तानविरुद्ध 'या' मॅचविनरच्या जागेवर खेळणार

पाकिस्तानकडून रिझवान आणि जमान यांच्याशिवाय केवळ बाबर आझम (13), साहिबझादा फरहान (19) आणि अब्बास आफ्रिदी (14) यांनीच १० धावांचा टप्पा पार केला. पाकिस्तानने 20 षटकात 8 बाद 134 धावा केल्या.

न्यूझीलंडकडून टीम साऊदी, मॅच हेन्री, लॉकी फर्ग्युसन आणि ईश सोधी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

पाकिस्तानचा विक्रम

दरम्यान, पाकिस्तानने या सामन्यात 134 धावांचा यशस्वी बचाव केल्याने एक विक्रम केला आहे. न्यूझीलंडमध्ये पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावांचा यशस्वी बचाव करण्याचा विक्रम त्यांनी केला आहे.

यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध 2021 मध्ये 156 धावांचा यशस्वी बचाव केला होता. या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने 2020 मध्ये 163 धावांचा यशस्वी बचाव केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com