ब्रिटनच्या McDonald मधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये जवळपास 50 मुलांच टोळकं या दुकानात घुसले आणि जबरदस्तीने बर्गर आणि कोल्ड ड्रिंक चोरून गोंधळ घातला. मुलांची ही कृती पाहून तेथे उपस्थित असलेल्या एकाही कर्मचाऱ्याने त्यांना थांबवण्याचे धाडस केले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांनीही या माहितीवर कोणतीही कारवाई केली नाही.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ब्रिटनच्या नॉटिंगहॅम सिटी सेंटरमध्ये रविवारी संध्याकाळी ही घटना घडली.
बीबीसीने दिलेल्या बातमीनुसार, 14 ते 16 वयोगटातील किमान 50 मुलांचा एक टोळकं रात्री 9 वाजता अचानक क्लंबर स्ट्रीट McDonald च्या आउटलेटमध्ये घुसला. काही लोकांनी तिथे तयार होणारे अन्न गोळा करायला सुरुवात केली आणि बाकीच्या मुलांनी ही घटना त्यांच्या फोनमध्ये कैद करायला सुरुवात केली. या टोळीत अनेक किशोरवयीन मुलीही होत्या आणि त्या तिथे मौजमजा करण्याबरोबरच खाद्यपदार्थांची चोरी करत केल्याचे दिसून येत आहे.
याबाबत माहिती देताना पोलिसांनी असे म्हटले आहे की, अनेकांनी McDonald मधील कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले व धमकावले. त्यानंतर ही टोळी मिल्टन स्ट्रीट, नॉटिंगहॅम येथील दुसर्या दुकानात पोहोचले, पण तिथे काही वरिष्ठ अधिकारी आल्यावर ते तिथून निघून गेले. पोलिसांनी या घटनेला गांभीर्याने घेतले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.