Sonali Phogat Death: खुनापूर्वी सोनालीवर बलात्कार केल्याचा आरोप

सुधीर सांगवान व सुखविंदर सिंग सांगवान यांनी पूर्वनियोजित कट आखत खून केल्याचा आरोप
Sonali Phogat Passed Away
Sonali Phogat Passed AwayDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी, म्हापसा: हरियाणातील भाजप नेत्या व अभिनेत्री सोनाली फोगट हिच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तिच्यासोबत असलेले सहकारी सुधीर सांगवान व सुखविंदर सिंग सांगवान यांनी तिचा पूर्वनियोजित कट आखत खून केला आहे. असा आरोप केला आहे.

(Sonali Phogat Death Rinku Dhaka accused of raping Sonali before the murder)

खुनापूर्वी तिच्यावर विषय प्रयोग करण्यात आला. एवढेच नाही तर खून करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कारही करण्यात आला असा सनसनाटी आरोप फोगट हिचा भाऊ रिंकू ढाका याने केला आहे. शवविच्छेदनपूर्वी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे, मात्र पोलिस त्यासाठी तयार नाहीत. दरम्यान, गुन्हा नोंद न केल्यास शवविच्छेदनास संमती न देण्याची भुमिका कुटुंबियांनी घेतल्याने पोलिस अडचणीत आले आहेत. संध्याकाळपर्यंत शवविच्छेदन करण्यात आलेले नाही.

मयत सोनाली फोगट हिचा भाऊ रिंकू ढाका याने आज हणजूणे पोलिस स्थानक गाठून दिलेल्या माहितीनुसार, सोनालीच्या मृत्यूची माहिती कळताच तो व इतर दोघे नातेवाईक काल रात्री 8 वाजता गोव्यात पोहोचले. हणजूण पोलिसात दिलेल्या तक्रारीत सोनाली हिच्यासोबत असलेले तिचे सहकारीच तिच्या मृत्यू जबाबदार आहेत व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र पोलीस तीच्या मारेकऱ्यांवर कारवाई करण्यास चालढकल करतायेत याबाबत त्यांनी पोलीस महासंचालकांशी चर्चा केली आहे. असे रिंकू ढाका यांनी म्हटले आहे.

सोनाली होत्या सतत भीतीच्या छायेत!

सोनालाची मृत्यूची घटना काल 23 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली होती. त्याच्या आदल्या रात्री सोनाली फोगट हिने हरियाणा येथील घरी आईला फोन केला होता. त्यावेळी तिने आई, बहीण, भावोजी तसेच माझ्याशी संवाद साधला होता. गेल्या काही दिवसांपासून जेवणानंतर तिचे हात-पाय थरथरत असल्याचे तसेच भीती वाटत असल्याचे तिने सांगितले होते. तिला आम्ही तिच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यानंतर सकाळी तिच्या मृत्यूची बातमी पोहोचली, असे रिकू ढाका यांनी हणजूण पोलिस स्थानकात तक्रार दिल्यानंतर सांगितले.

संशयास्पदरित्या मृत्यूची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी

सोनाली फोगट हिचा मृत्यू संशयास्पदरित्या झाल्याने या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी करण्यात येत आहे. हणजूण पोलिस स्थानकात दिलेली तक्रार नोंद करून गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शवविच्छेदन करू देणार नाही. रिंकू ढाका, सोनालीचा भाऊ याने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com