Plane Crash Landing Dainik Gomantak
ग्लोबल

Plane Crash Landing: पंख तुटले, हाहाकार उडाला..! समुद्रात विमानाचं क्रॅश लँडिंग, 55 प्रवाशांसाठी वैमानिक ठरला 'देवदूत' VIDEO

Somalia Plane Crash Landing: सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये एका प्रवासी विमानाचे समुद्रात इमर्जन्सी लँडिंग झाल्याची खळबळजनक घटना घडली.

Manish Jadhav

Somalia Plane Crash : सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये एका प्रवासी विमानाचे समुद्रात इमर्जन्सी लँडिंग झाल्याची खळबळजनक घटना घडली. एडेन अब्दुले आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच विमानात तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे वैमानिकाला हे धाडसी पाऊल उचलावे लागले.

या घटनेचा एक थरकाप उडवणारा व्हिडिओ देखील समोर आला असून, कशा प्रकारे विमान रनवेवरुन घसरुन थेट हिंद महासागराच्या उथळ पाण्यात जाऊन पडले, हे त्यात स्पष्ट दिसत आहे. या दुर्घटनेवेळी विमानात 50 प्रवासी आणि 5 क्रू मेंबर्स असे एकूण 55 लोक होते, सुदैवाने या सर्वांचे प्राण वाचले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

सोमालियाच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, 'स्टार्स्की एव्हिएशन'चे फॉकर 50 (Fokker 50) हे विमान मोगादिशूहून उत्तरेकडील गलकायो शहराकडे जाण्यासाठी निघाले होते. टेकऑफनंतर साधारण 15 मिनिटांतच विमानात काही गंभीर तांत्रिक समस्या जाणवू लागल्या. प्रसंगावधान राखून वैमानिकाने तातडीने नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि पुन्हा विमानतळावर परतण्याची परवानगी मागितली. मात्र, लँडिंगच्या वेळी विमानाचा वेग नियंत्रित करणे कठीण झाले आणि विमान धावपट्टीवरुन घसरुन थेट जवळच असलेल्या समुद्राच्या (Sea) वाळूमध्ये आणि उथळ पाण्यात जाऊन विसावले.

या लँडिंगमुळे विमानाचे पंख आणि पुढील भागाचे (Nose) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये प्रवासी विमानाबाहेर येऊन सुरक्षितपणे चालताना दिसत आहेत. बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत सर्व प्रवाशांना बाहेर काढले. उथळ पाणी आणि वैमानिकाचा शांत संयम यामुळेच इतका मोठा अपघात होऊनही कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. सोमालियाचे परिवहन मंत्री मोहम्मद फराह नूह यांनी सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची पुष्टी केली असून वैमानिकाच्या धाडसाचे कौतुक केले आहे.

विमानातील तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरु करण्यात आला आहे. ही घटना सोमालियामधील विमान वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठा धडा मानली जात असली तरी, वैमानिकाच्या तत्परतेमुळ 55 जणांचे प्राण वाचल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT