Ajit Pawar Plane Crash: काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! अजित पवारांच्या विमान अपघाताचं CCTV फुटेज आलं समोर; क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं VIDEO

Ajit Pawar Accident Video: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघाताचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आता समोर आले.
Ajit Pawar Accident Video
Ajit Pawar Plane CrashDainik Gomantak
Published on
Updated on

Ajit Pawar Accident Video: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघाताचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आता समोर आले असून हे दृश्य पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल असे आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी विमान जमिनीवर कोसळले आणि क्षणातच आगीचा एक मोठा गोळा आकाशात झेपावला.

अजित पवार हे आपल्या हक्काच्या बारामतीमध्ये पोहोचणार होते, परंतु दुर्दैवाने लँडिंगच्या काही सेकंद आधीच ही काळाची झडप पडली. विमान जमिनीवर आदळताच त्याचे दोन तुकडे झाले आणि संपूर्ण विमानात स्फोटासह भीषण आग लागली. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानात असलेल्या सर्व पाचही जणांचा दुर्दैवी अंत झाला.

सीसीटीव्ही फुटेजमधील दृश्य अत्यंत भयावह आहे. विमान कोसळताच आकाशात काळ्या धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. ज्या ठिकाणी हा अपघात झाला, त्याच्या अगदी बाजूलाच एक रस्ता होता, ज्यामुळे हा थरार तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी प्रत्यक्ष अनुभवला. अपघाताच्या तीव्रतेमुळे विमानाचा अक्षरशः चक्काचूर झाला असून घटनास्थळी विमानाचे अवशेष, कागदपत्रे आणि फाईल्स विखुरलेल्या पाहायला मिळाल्या. आगीचे स्वरुप इतके रौद्र होते की, विमानातील (Plan) सर्वांचे मृतदेह पूर्णपणे जळाले होते, ज्यामुळे त्यांची ओळख पटवणेही कठीण झाले होते. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी तातडीने धाव घेतली, परंतु आगीमुळे कोणालाही वाचवणे शक्य झाले नाही.

Ajit Pawar Accident Video
Ajit Pawar Plane Crash: आग, धूर अन् विमानाचे तुकडे...! महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताचे व्हिडिओ, फोटो समोर

या भीषण अपघातानंतर (Accident) सर्व मृतदेह बारामती येथील रुग्णालयात नेण्यात आले. अजित पवार यांचे पार्थिव रुग्णालयात पोहोचताच तिथे आधीच जमलेल्या त्यांच्या हजारो समर्थकांनी एकच टाहो फोडला. आपल्या लाडक्या नेत्याची एक शेवटची झलक पाहण्यासाठी समर्थकांनी मोठी गर्दी केली. रुग्णालयाबाहेर उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होते आणि लोकांचा आक्रोश पाहून अजित पवार यांचे बारामतीवर आणि तेथील लोकांचे आपल्या 'दादां'वर किती प्रेम होते, याची प्रचिती येते. राजकारणातील एका धडाडीच्या पर्वाचा अशा प्रकारे अंत झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र सध्या सुन्न झाला असून, बारामतीमध्ये सध्या शोकसागरात बुडाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com