Libya Boat Accident 2023 (File Photo)  Dainik Gomantak
ग्लोबल

Libya च्या समुद्र किनाऱ्यावर स्थलांतरितांनी भरलेले जहाज बुडाले; लहान मुले आणि महिलांसह 61 जणांच्या मृत्यूची भीती

Libya Boat Accident: विशेष म्हणजे स्थलांतरितांचा बुडून मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

Ashutosh Masgaunde

Ship full of migrants sinks off Libyan coast; 61 people including children and women are feared dead:

लिबियाच्या समुद्र किनाऱ्यावर स्थलांतरितांनी भरलेले जहाज बुडाले असून, या अपघातात महिला आणि लहान मुलांसह 61 प्रवासी बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. लिबियातील इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन (IOM) ने शनिवारी सोशल मीडियावर ही माहिती दिली.

आयओएमने या अपघातातून वाचलेल्यांच्या हवाल्याने सांगितले की, जहाजावर एकूण 86 लोक होते. ते लिबियातील ज्वारा शहरातून निघाले होते.

समुद्रमार्गे युरोप गाठू इच्‍छित लोकांसाठी लिबिया हा एक प्रमुख लॉन्चिंग पॉइंट आहे. आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील देशांतील लोकांना युद्ध आणि अशांततेपासून वाचण्यासाठी लिबियामार्गे युरोपला जायचे आहे.

किनारी भागांवर नियंत्रण ठेवणाऱ्या लष्करी गटांकडून मानवी तस्करीचे जाळे या मार्गांवर चालवले जाते. ते स्थलांतरितांना धोकादायक भूमध्य समुद्रातून धोकादायक प्रवासाद्वारे इच्छित स्थळी पोहचवतात.

अलिकडच्या काही महिन्यांत, लिबियातील सुरक्षा दलांनी अशा स्थलांतरितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली आहे.

विशेष म्हणजे स्थलांतरितांचा बुडून मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

जूनमध्येही अशीच घटना घडली होती, जेव्हा ७९ प्रवासी बुडाले होते आणि शेकडो बेपत्ता झाले होते.

फेब्रुवारीमध्ये झालेल्या वादळात त्यांची बोट इटलीच्या कॅलेब्रियन किनार्‍याजवळील खडकांवर आदळली होती, त्यात 96 लोकांचा मृत्यू झाला होता. अशी आणखी बरीच प्रकरणे आहेत.

जहाज लिबियातून निघाल्याचे एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. नौकानयन मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, जहाजावरील बहुतेक लोक इजिप्त, सीरिया आणि पाकिस्तानचे होते.

ग्रीकची सरकारी वृत्तसंस्था ईआरटीने सांगितले की, जहाज लिबियाच्या टोब्रुक शहरातून इटलीला जात होते. जे ग्रीस मध्ये क्रीट बेटाच्या दक्षिणेस स्थित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT