लिबियाच्या महिला मंत्र्याबाबत इस्रायलमध्ये मोठी खळबळ, पंतप्रधानांनी दिला 'हा' आदेश

लिबियाच्या परराष्ट्र मंत्री नजला मंगूश यांनी नुकतीच इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांशी गुप्त बैठक घेतली.
Libya Foreign Minister Najla Mangoush
Libya Foreign Minister Najla Mangoush Dainik Gomantak
Published on
Updated on

Libya Foreign Minister Najla Mangoush: लिबियाच्या परराष्ट्र मंत्री नजला मंगूश यांनी नुकतीच इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांशी गुप्त बैठक घेतली. या बैठकीनंतर इस्रायलमध्ये खळबळ उडाली आहे.

बैठकीनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एक आदेश जारी केला आहे. पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले की, यापुढे कोणत्याही गुप्त बैठका होणार नाहीत. सर्व राजनैतिक बैठकांचा तपशील आधीच निश्चित केला जाईल.

दरम्यान, इस्रायलचे (Israel) परराष्ट्र मंत्री एली कोहेन यांच्याशी झालेल्या गुप्त बैठकीनंतर लिबियाने परराष्ट्र मंत्री नजला मंगूश यांना तात्पुरते निलंबित केले आहे. लिबियामध्ये प्रचंड निदर्शने होत आहेत. नजला यांच्याविरोधात लोकांमध्ये रोष आहे.

या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे सांगण्यात येत आहे. नजला यांनी स्वत: गेल्या आठवड्यात इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत रोममध्ये गुप्त बैठक झाल्याचे मान्य केले होते.

Libya Foreign Minister Najla Mangoush
Russia Ukraine War: युक्रेन काय मागं सरकत नाही... रशियावर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; NATO कडे संशयाची सुई

नजला निलंबित, लिबियामध्ये हिंसक निषेध

दुसरीकडे, गुप्त बैठकीचे वृत्त लीक झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. राजधानी त्रिपोलीमध्ये हिंसक निदर्शने होत आहेत. लोक पंतप्रधान अब्दुल हमीद दबीबे यांच्या विरोधात घोषणा देत आहेत.

त्यांनी (नजला) देशाचा विश्वासघात केल्याचे लोक म्हणत आहेत. त्याचवेळी, आपल्या देशाची परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून पंतप्रधानांनी परराष्ट्र मंत्री नजला यांना निलंबित केले. अनेक शहरांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांचे पोस्टर्स जाळण्यात आले.

इस्रायलने हा आदेश जारी केला

लिबियामध्ये जाळपोळीच्या अनेक घटना घडल्या. पीएम अब्दुल हमीद यांनी नजला यांच्याविरोधात चौकशीचे आदेश जारी केले. दुसरीकडे, या गुप्त बैठकीनंतर इस्रायलही कठोर झाला आहे.

सर्व मंत्रालयांना आदेश जारी करताना पंतप्रधान म्हणाले की, कोणतीही गुप्त राजनैतिक बैठक घेण्यापूर्वी त्यांच्या कार्यालयाची परवानगी घ्यावी.

इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयानेच गेल्या रविवारी या गुप्त बैठकीची पुष्टी केली होती. संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल असल्याचे ते म्हणाले होते.

Libya Foreign Minister Najla Mangoush
Russia- Ukraine War: युक्रेनच्या सैन्याने मिळवली रशियाच्या ताब्यातील महत्वाची जागा

नजला तुर्किला पळून गेल्या

यानंतर लिबियामध्ये हिंसक निदर्शने सुरु झाली. लिबियाचे सरकार (Government) अडचणीत आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लिबियाच्या परराष्ट्र मंत्री नजला मंगूश यांनी सुरक्षेचा विचार करुन देश सोडून तुर्कस्तानला पळ काढला आहे.

लिबियामध्ये दोन परस्परविरोधी सरकारे आहेत. नजला त्रिपोलीतून चालवल्या जाणाऱ्या सरकारच्या परराष्ट्र मंत्री आहेत. लिबिया आणि इस्रायलमध्ये राजनैतिक संबंध नाहीत. लिबिया पॅलेस्टाईनला पाठिंबा देतो. तो इस्रायलला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com