PM Modi and Rishi Sunak Dainik Gomantak
ग्लोबल

VIDEO: 'AI मध्ये भारत पुढे, पण क्रिकेटमध्ये आम्हीच भारी', पंतप्रधान मोदींना सुनक यांचं मिश्किल उत्तर; जगाचं वेधलं लक्ष

PM Modi and Rishi Sunak AI Conversation: ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात भारताने घेतलेल्या उत्तुंग भरारीचे तोंडभरुन कौतुक केले.

Manish Jadhav

Rishi Sunak Praises India AI Growth: ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात भारताने घेतलेल्या उत्तुंग भरारीचे तोंडभरुन कौतुक केले. तंत्रज्ञान आणि सुरक्षेच्या बाबतीत भारत आणि ब्रिटनमधील संबंध आता एका नव्या उंचीवर पोहोचल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अलिकडेच एका कार्यक्रमात बोलताना सुनक यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या ‘AI इंडेक्स’चा दाखला दिला.

त्यांनी प्रांजळपणे मान्य केले की, या क्रमवारीत भारताने (India) ब्रिटनला मागे टाकले असून, भारत आता खऱ्या अर्थाने एक जागतिक ‘एआय सुपरपॉवर’ बनला आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या संभाषणातील एक मिश्किल किस्साही सांगितला. "भारत एआयमध्ये जरी पुढे गेला असला, तरी आयसीसी टेस्ट क्रिकेट रँकिंगमध्ये इंग्लंड अजूनही आघाडीवर आहे," असे आपण मोदींना गमतीने म्हटल्याचे सुनक यांनी हसत हसत नमूद केले.

एआय नियमन आणि नियंत्रणाबाबत भारत आणि ब्रिटनचा (Britain) दृष्टिकोन पूर्णपणे मिळताजुळता असल्याचे सुनक यांनी सांगितले. युरोपियन युनियनचे अत्यंत कडक नियम किंवा अमेरिकेचा अस्थिर दृष्टिकोन स्वीकारण्याऐवजी दोन्ही देशांना एक व्यावहारिक मार्ग स्वीकारायचा आहे. भारत आणि ब्रिटन अशा तत्त्वांवर काम करत आहेत जे नवीन संशोधनांना आणि नवनिर्मितीला चालना देतील, त्यावर निर्बंध लादणार नाहीत. तंत्रज्ञानाचा विकास आणि त्याची सुरक्षा या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालल्या पाहिजेत, जेणेकरुन समाजाला त्याचा खरा लाभ मिळेल, यावर सुनक यांनी विशेष भर दिला.

तंत्रज्ञान आणि सुरक्षेच्या क्षेत्रात वाढत्या सहकार्यावर भाष्य करताना सुनक यांनी दोन्ही देशांमधील करारांविषयी सविस्तर माहिती दिली. ब्रिटनची ‘एआय सेफ्टी इन्स्टिट्यूट’ आणि भारताने नुकतीच स्थापन केलेली अशाच प्रकारची संस्था यांच्यात सखोल समन्वय असणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी एक चपखल तुलना करताना म्हटले की, "ज्याप्रमाणे गुप्तचर माहितीची देवाणघेवाण केल्याने दहशतवादासारख्या मोठ्या संकटांशी लढण्यास मदत झाली आहे, त्याचप्रमाणे एआय संस्थांमधील परस्पर सहकार्य आपल्याला या नवीन तंत्रज्ञानाशी संबंधित भविष्यातील धोक्यांपासून वाचवेल." ही भागीदारी केवळ डेटा शेअरिंगपुरती मर्यादित नसून, ती एका सुरक्षित डिजिटल भविष्याचा पाया आहे.

आपल्या भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात ऋषी सुनक यांनी ‘यूके-इंडिया टेक्नॉलॉजी सिक्युरिटी इनिशिएटिव्ह’चा उल्लेख केला. येणाऱ्या काळात दोन्ही देशांमधील तांत्रिक संबंधांना ही योजना अधिक बळकटी देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी या भागीदारीला 21 व्या शतकातील सर्वात शक्तिशाली सुरक्षा आणि तांत्रिक भागीदारी म्हणून संबोधले. ऑक्टोबर 2022 ते जुलै 2024 या आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात ऋषी सुनक यांनी भारत आणि ब्रिटनमधील सामरिक संबंध सुधारण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली होती. ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे आणि पहिले हिंदू पंतप्रधान म्हणून इतिहास रचणाऱ्या सुनक यांनी आजही दोन्ही देशांमधील या मैत्रीपूर्ण आणि तांत्रिक संबंधांचा पुरस्कार केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

ED Raid: 155 कोटींचा बँक घोटाळा अन् 'ईडी'चा थेट गोव्यात छापा! 'या' बड्या कंपनीवरील कारवाईने देशभरात खळबळ

SCROLL FOR NEXT