अभिमानास्पद! ‘ओल्ड गोवा’ ब्रॅण्डचे मोदींकडून कौतुक; नारळ प्रक्रिया व मूल्यवर्धनासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पीय तरतूद जाहीर

Modi Praises Old Goa Brand: ‘ओल्ड गोवा ऑईल ॲण्ड फूडस’चे अध्यक्ष परेश शेटगावकर यांना ६ मार्च रोजी नारळ प्रोत्साहन योजनेवरील राष्ट्रीय वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले होते.
Modi Praises Old Goa Brand
Modi Praises Old Goa BrandDainik Gomantak
Published on
Updated on

PM Modi Goa brand appreciation : ‘ओल्ड गोवा ऑईल ॲण्ड फूडस’चे अध्यक्ष परेश शेटगावकर यांना ६ मार्च रोजी नारळ प्रोत्साहन योजनेवरील राष्ट्रीय वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले होते. या वेबिनारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले, तर केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी अध्यक्षस्थान भूषविले. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी विशेषतः नारळ प्रक्रिया व मूल्यवर्धनासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पीय तरतूद जाहीर केली.

ओल्ड गोवा ब्रॅण्डने नारळावर आधारित मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्यातीमध्ये मिळवलेल्या यशाची दखल म्हणून या वेबिनारमध्ये त्यांना निमंत्रित केले होते. ऑईल पुलिंग उत्पादनांची यूएईमध्ये झालेली निर्यात यांमुळे या ब्रॅण्डला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे.

Modi Praises Old Goa Brand
Narendra Modi Resolutions: PM मोदींचा गोवा दौरा आणि त्यांचे 9 संकल्प तडीस नेण्याचे आव्हान

स्थानिक पातळीवर विकसित झालेल्या या ब्रॅण्डने गोव्याच्या नारळ आणि पारंपरिक समुद्री मीठ यांना प्रीमियम वेलनेस उत्पादनांच्या रूपात जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून दिले आहे. यामुळे मध्यपूर्वेतील बाजारपेठेत ओल्ड गोवा उत्पादनांची लक्षणीय मागणी वाढली आहे. यावेळी परेश शेटगावकर यांनी भारत सरकारला स्थानिक पिकांवर अधिक भर देण्याचे आवाहन केले.

Modi Praises Old Goa Brand
PM Modi Goa Visit: 'श्रीकृष्ण जसे विचार करत होते, तसे PM मोदीही सर्वसमावेशक विचार करतात'; विद्याधीश स्वामींचे गौरवोदगार

यामुळे प्रतिव्यक्ती उत्पन्न वाढण्यास मदत होईल तसेच निर्यातीद्वारे देशाच्या जीडीपीमध्ये वाढ होईल, असे त्यांनी नमूद केले. अशा प्रकारच्या स्वतंत्र अर्थसंकल्पीय तरतुदीमुळे शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातही मोठी वाढ होईल, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com