PM Modi First Press Conference Google image
ग्लोबल

PM Modi First Press Conference: पंतप्रधान मोदींची 9 वर्षात पहिलीच पत्रकार परिषद; 5 महत्वाचे मुद्दे

गोमंतक ऑनलाईन टीम

PM Modi US visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असून राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याशी त्यांची द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा झाली. या चर्चेनंतर उभय नेत्यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. दरम्यान, नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतरच्या ९ वर्षात त्यांची ही पहिलीच पत्रकार परिषद ठरली आहे.

या पत्रकार परिषदेत मोदींनी केवळ दोनच प्रश्नांना उत्तरे दिली. दरम्यान, नऊ वर्षात देशात एकही पत्रकार परिषद घेतली नाही, आणि अमेरिकेत आत्ता पत्रकार परिषद घ्यावी लागल्यावरून काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

या पत्रकार परिषदेतील महत्वाचे 5 मुद्दे जाणून घेऊया..

1. एका पत्रकाराने धार्मिक असहिष्णुता आणि भाषण स्वातंत्र्यावर दबावाबाबत प्रश्न विचारल्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, अमेरिकन नागरिकांकडून भारताच्या लोकशाहीबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत आश्चर्य वाटले. आमच्या देशात लोकशाही आहे. अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांच्या डीएनएमध्ये लोकशाही आहे. भारतीय लोकशाहीमध्ये धर्म, पंथ, जात, वय, भूभाग अशा कोणत्याही मुद्यावरून भेदभाव केला जात नाही.

2. मोदी म्हणाले की, लोकशाही हेच आमचे स्पिरीट आहे. लोकशाही हा आमचा जगण्याचा भाग आहे. आमच्या पूर्वजांनीच संविधानाच्या रूपात लोकशाही ही संकल्पना आम्हाला दिली आहे. दरम्यायान, याबाबत बायडेन यांनीही मोदींशी लोकशाही मुल्यांबाबत चांगली चर्चा झाल्याचे म्हटले.

3. चीनबाबतच्या प्रश्नावर मोदी म्हणाले की, भारत आणि अमेरिका हे जगातील सर्वात मोठे दोन लोकशाही देश जागतिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी योगदान देऊ शकतात. दोन्ही देशातील सहकार्याला कोणतीही सीमा नाही. यावेळी भारतात सीमेपलीकडून होत असलेल्या कारवायांवर ठोस कृतीची गरज व्यक्त करण्यात आली.

4. भारत आणि अमेरिका दहशतवादाविरूद्धच्या लढाईत खांद्याला खांदा लावून सोबत आहेत. भारतात सीमेपलीकडून होत असलेला दहशतवाद संपविण्यासाठी ठोस कृतीबाबत दोन्ही देशांनी सहमती दर्शवली.

5. युक्रेनमध्ये शांतता नांदण्यासाठी मदत करण्यास भारत तयार आहे, असेही मोदी म्हणाले. इंडो-पॅसिफिक क्षेत्राचे यश, विकास महत्वाच आहे. या भागात शांतता आणि सुरक्षिततेला आमचे प्राधान्य आहे. दोन्ही नेत्यांचे यावर एकमत झाल्याचे मोदी यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT