Elon Musk meets PM Modi: पीएम मोदींच्या भेटीनंतर एलन मस्क मालामाल, टेस्लाचे शेअर्स गगनाला भिडले!

Elon Musk Meeting With PM Modi: पीएम मोदींना भेटल्यानंतरच एलन मस्क यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली.
Elon Musk meets PM Modi
Elon Musk meets PM ModiDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Elon Musk Meeting With PM Modi: पीएम मोदींना भेटल्यानंतरच एलन मस्क यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली. मस्क यांनी मोदींसोबतच्या भेटीत भारतात येण्याबाबत सांगितले होते, ज्याचा मस्क यांना खूप मोठा फायदा झाला. टेस्लाच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. मस्क यांच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे कंपनीचे मार्केट कॅप सुमारे $10 अब्जने वाढले आहे.

एका वर्षात 106 अब्ज डॉलर्सचा नफा

दरम्यान, 21 जून 2023 रोजी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, एलन मस्क (Elon Musk) यांची संपत्ती $243 अब्ज घोषित करण्यात आली आहे. गेल्या एका वर्षात मस्क यांनी $106 बिलियन कमावले आहेत.

Elon Musk meets PM Modi
PM Modi In USA: प्रीडेटर ड्रोन आणि फायटर जेट इंजिन करारातून सुरू होणार, भारत-अमेरिका संबंधांचा नवा अध्याय

पीएम मोदींचा फॅन

मस्क म्हणाले की, 'मी मोदींचा फॅन आहे. ही एक छान भेट होती आणि मला ते खूप आवडतात. मी म्हणू शकतो की त्यांना (पीएम मोदी) खरोखरच भारतासाठी काही गोष्टी करायच्या आहेत. विशेष म्हणजे, त्यांना नवीन गुंतवणूकदारांना (Investors) पाठिंबा द्यायचा आहे, जेणेकरुन यामधून भारताचे हित साधले जाईल. पुढच्या वर्षी मी भारताला भेट देण्याचा विचार करत आहे.'

मस्क चीनच्या दौऱ्यावर गेले होते

काही दिवसांपूर्वी मस्क चीनच्या दौऱ्यावरही गेले होते, तिथे चीनी लोकांनी त्यांच्यावर स्तुतीसुमनांची उधळण केली होती. चीन दौऱ्यात त्यांनी अनेक सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. आता चीनमध्येही त्यांचा व्यवसाय वाढवण्याची त्यांची योजना आहे.

Elon Musk meets PM Modi
PM Modi In USA: PM मोदींचे ग्रँड वेलकम, न्यूयॉर्कच्या हडसन नदीवर FIA ने फडकवला 250 फूट लांब बॅनर, पाहा Video

भारतातही व्यवसाय वाढवता येईल

एलन मस्क भारतात आल्याने ते भारतातही आपला व्यवसाय वाढवतील हे निश्चित झाले आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही याबाबत माहिती दिली आहे. मस्क यांना त्यांची टेस्ला भारतात आणायची असेल तर त्यांना भारतात इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करावी लागेल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. यामध्ये त्यांना कोणतीही अडचण नाही, परंतु कंपनीने चीनमधून कार आयात करु नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

PM Kisan Portal Update
US Bank Layoffs India 80 Customer Service Employees
PM Narendra Modi Birthday Wishes Times Square Billboard
MEA India Energy Security Statement US Tariff
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com