PM Modi US Visit: 'अमेरिका-भारत जगाचे नेतृत्व करताहेत...', बायडन यांचा चीनला सूचक इशारा

PM Modi US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथील व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले आहेत.
PM Modi & Joe Biden
PM Modi & Joe BidenDainik Gomantak
Published on
Updated on

PM Modi US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथील व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत केले.

या दरम्यान, पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी संबोधित केले. राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी पंतप्रधान मोदी आणि भारताचे कौतुक केले. यानंतर पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष बायडन यांचे आभार मानून व्हाईटमध्ये भाषणाला सुरुवात केली.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी व्हाईट हाऊसमध्ये हिंदीत भाषण केलं. यावेळी पीएम मोदी म्हणाले की, मी एक सामान्य व्यक्ती म्हणून अनेक वर्षांपूर्वी अमेरिकेला (America) आलो होतो. इथे मी व्हाईट हाऊस बाहेरुन पाहिले होते.

पण व्हाईट हाऊसचे दरवाजे केवळ भारताच्या पंतप्रधानांसाठीच नव्हे तर इतक्या मोठ्या संख्येने भारतीयांसाठी उघडण्याची ही पहिलीच वेळ आहे. भाषणादरम्यान भारतीय संविधानावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत सर्व जन हिताय-सर्व जन सुखाय मंत्र जपतो.

PM Modi & Joe Biden
PM Modi US Visit: पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यातून भारताला काय मिळणार? जाणून घ्या

बायडन म्हणाले की, या शतकात जगासमोरील आव्हानांमध्ये भारत आणि अमेरिकेने एकत्र काम करणे आणि नेतृत्व करणे आवश्यक आहे, जे दोन्ही देश करत आहेत.

भारतासोबतच्या (India) भागीदारीत, आम्ही मुक्त, समृद्ध, सुरक्षित इंडो-पॅसिफिक प्रदेशाची दृष्टी पुढे नेण्यासाठी क्वाडला मजबूत आणि उन्नत केले आहे. बायडन म्हणाले की, अमेरिकेने भारतासोबत नवीन तंत्रज्ञान सामायिक केले. यामुळे आपल्या नवीन पिढ्यांना मदत होईल.

PM Modi & Joe Biden
PM Modi US Visit: PM मोदींच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी भारतीयांचा उत्साह, वॉशिंग्टनसह अनेक शहरांमध्ये एकता रॅली, पाहा Video

बायडन पुढे म्हणाले की, भारत आणि अमेरिका यांनी गरिबी निर्मूलन आणि हवामान बदलावर अनेक गोष्टी एकत्र केल्या आहेत आणि करत आहेत.

अमेरिका-भारत जगाचे नेतृत्व करत आहे. अमेरिकेचे भारतासोबतचे संबंध प्रत्येक पिढीसोबत घट्ट होत आहेत, कारण दोन्ही देशांदरम्यान संबंध अधिक घनिष्ठ होत चालले आहेत.

अमेरिकेतील भारतीय डायस्पोराच्या योगदानावरुनच दोन्ही देशांमधील संबंध दिसून येतात, असेही पुढे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी म्हटले. भारतीय केवळ व्यवसायातच नव्हे तर अमेरिकन संसदेत (काँग्रेस) मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com