People Who Died In The Last Few years, Are Related to Russian President Vladimir Putin. Dainik Gomantak
ग्लोबल

Vladimir Putin: गूढ मृत्यूंचे पुतिन कनेक्शन! कोणाला गोळ्या झाडल्या तर कोणाला विषबाधा झाली

Vladimir Putin: अलेक्झांडर पेरेपिलिची यांच्या पोटात अत्यंत दुर्मिळ आणि प्राणघातक विष म्हणून ओळखल्या जाणार्‍या जेलसेमियम वनस्पतीचे अंश आढळून आल्याचे समोर आले होते.

Ashutosh Masgaunde

People Who Died In The Last Few years, Are Related to Russian President Vladimir Putin:

गेल्या काही वर्षांत रशियाती अशा लोकांचा मृत्यू झाला आहे, जे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी एक ना एक प्रकारे संबंधित आहेत. यातील अनेकजण तेल आणि वायूच्या व्यवसायात होते.

आता यामध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे. वॅगनर ग्रुपचे (Wagner Group) प्रमुख येवगेनी प्रीगोझिन (Yevgeny Prigozhin) हे रशियातील विमान अपघातात ठार झाल्याची माहिती पुढे आली आहे.

येवगेनी प्रिगोझिन यांनी नुकतेच रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याविरोधात बंड केले होते. त्यानंतर प्रीगोझिन यांना देशातून हाकलून देण्यात आले होते.

अ‍ॅना पॉलिटकोव्स्काया (Anna Politkovskaya)

7 ऑक्टोबर 2006 रोजी मानवाधिकार उल्लंघनाविरोधात वार्तांकन करणारी महिला पत्रकार अ‍ॅना पोलिटकोव्स्काया यांची हत्या करण्यात आली.

अ‍ॅना पोलिटकोव्स्काया यांनी एक पुस्तक लिहिले होते, ज्यामध्ये पुतिन यांच्यावर जोरदार टीका केली होती.

अ‍ॅना सुपरमार्केटमधून घरी परतत असताना तिच्यावर गोळीबार झाला. दोन मुलांची आई असलेल्या 48 वर्षीय पोलिटकोव्स्काया हिची मॉस्कोमधील घराबाहेर हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येनंतर पाश्चिमात्य देशात हाहाकार माजला होता.

व्हिक्टर युश्चेन्को (Viktor Yushchenko)

2004 च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान युक्रेनचे विरोधी पक्षनेते व्हिक्टर युश्चेन्को यांना विषबाधा झाली होती, ज्यामध्ये ते रशियाचे कट्टर समर्थक असलेल्या पंतप्रधान व्हिक्टर यानुकोविच यांच्या विरोधात उभे होते.

युक्रेनियन सुरक्षा सेवांच्या अधिकार्‍यांसह डिनर दरम्यान व्हिक्टर यांना विषबाधा झाली होती. त्याच्या शरीरात सामान्यपेक्षा 1000 पट जास्त डायऑक्सिन आढळले. विषामुळे त्याचा चेहरा आणि शरीर विद्रूप झाले होते.

अलेक्झांडर पेरेपिलिची (Alexander Perepillichny)

अलेक्झांडर पेरेपिलिची नोव्हेंबर 2012 मध्ये जॉगिंग करुन आल्यानंतर लंडनमध्च्याये त्यांच्या आलिशान घराजवळ मृतावस्थेत आढळून आले.

अलेक्झांडर पेरेप्लिचनी यांनी 2009 मध्ये रशियन मनी लाँडरिंग योजनेच्या स्विस तपासात मदत केल्यानंतर ब्रिटनमध्ये आश्रय मागितला. त्यामुळे त्यांची हत्या झाली असावी असा अंदाज बांधला जात होता.

त्याच्या पोटात अत्यंत दुर्मिळ आणि प्राणघातक विष म्हणून ओळखल्या जाणार्‍या जेलसेमियम वनस्पतीचे अंश आढळून आल्याचे समोर आले होते.

अलेक्झांडर लिटविनेन्को (Alexander Litvinenko)

माजी KGB एजंट आणि पुतिन यांचे टीकाकार अलेक्झांडर लिटविनेन्को यांचाही संशयास्पद मृत्यू झाला आहे. लिटविनेन्कोच्या शरीरात किरणोत्सर्गी पोलोनियम विष आढळले होते.

लिटविनेन्को हे पुतिन चालवलत असलेल्या एफएसबीचे संचालक होते. नंतर त्यांनी पुतिन यांच्यावर जोरदार टीका केली. लिटविनेन्को यांनी 1991 च्या अपार्टमेंट बॉम्बस्फोटासाठी पुतीनलाही जबाबदार धरले होते. यामध्ये 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

डेनिस वोरोनेन्कोव्ह (Denis Voronenkov)

रशियन खासदार डेनिस वोरोनेन्कोव्ह यांची युक्रेनची राजधानी कीवमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

डेनिस यांनी पुतिन यांच्यावर टीका केली आणि वाद वाढत गेल्याने ते रशिया सोडून युक्रेनला गेले. 2017 मध्ये एका हॉटेलमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT