Yevgeny Prigozhin Dead: रशिया-युक्रेन यांच्यात सुरु असलेलं युद्ध काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच आता, रशियामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. वॅगनर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रीगोझिन हे रशियातील विमान अपघातात ठार झाल्याची माहिती आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियाचे बिझनेस जेट बुधवारी मॉस्कोहून सेंट पीटर्सबर्गला जात होते. त्या विमानात 10 जण होते.
रशियन नागरी विमान वाहतूक विभागाच्या म्हणण्यानुसार, वॅगनर प्रमुख येवगेनी प्रीगोझिन या प्रवास करत असलेल्या 10 जणामध्ये होते. रशियन एजन्सी विमानाच्या अवशेषाचा शोध घेत आहेत.
रशियन स्टेट न्यूज एजन्सी तासने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात (Accident) मॉस्कोपासून 100 किमी अंतरावर असलेल्या त्वेर भागात झाला. या अपघातात विमानातील 3 पायलट आणि 7 प्रवासी ठार झाले.
दुसरीकडे, येवगेनी प्रिगोझिन यांनी रशियामध्ये (Russia) खाजगी लष्करी दल बनवले होते. हे सैन्य दल रशियन सैन्यासोबत युक्रेनविरुद्ध युद्ध लढत होते. परंतु या सैन्य दलाने या वर्षी जूनमध्ये रशियन लष्करी कमांडर्सच्या तळावर हल्ला करुन बंड केले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.