जपानने अणु प्रकल्पातून किरणोत्सर्गी पाणी सोडल्याने चीनची घाबरगुंडी, भारतावरही होणार परिणाम

जपानने त्सुनामीमुळे उद्ध्वस्त झालेल्या फुकुशिमा डायची अणु प्रकल्पातून 133 दशलक्ष लिटर किरणोत्सर्गी पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. हे पाणी सोडल्यामुळे चीनसह हाँगकाँग आणि दक्षिण कोरियासारखे देश घाबरले आहेत.
Radioactive Water Fukushima.
Radioactive Water Fukushima.Dainik Gomantak
Published on
Updated on

Japan's release of radioactive water from a nuclear power plant will affect China, India too:

जपानने फुकुशिमा अणु प्रकल्पातील पाणी (Radioactive Water Fukushima) समुद्रात सोडण्यास आज सुरुवात केली. जपानी वेळेनुसार दुपारी 1:03 वाजता ही प्रक्रिया सुरू करण्यात आली.

जपान टाइम्सच्या वृत्तानुसार, पहिल्या दिवशी सुमारे 2 लाख लिटर पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर ते 4.60 लाख लिटरपर्यंत वाढवले ​​जाईल.

किरणोत्सर्गी पाणी सोडण्यासत संयुक्त राष्ट्रांची परवाणगी

यूएनची अणु एजन्सी IAEA ने किरणोत्सर्गी पाणी समुद्रात सोडण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. एक हजार स्टेनलेस स्टीलच्या टाक्यांमध्ये ठेवलेले 133 कोटी लिटर पाणी 30 वर्षांच्या कालावधीत सोडले जाणार आहे.

दररोज 5 लाख लिटर किरणोत्सर्गी पाणी समुद्रात मिसळले सोडले जाईल. समुद्रात त्याचा प्रभाव कमी व्हावा यासाठी असे केले जात आहे. सध्या ज्या भागात पाणी सोडण्यात येणार आहे, त्या भागापासून तीन किलोमीटरपर्यंतच्या परिसरात मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे.

कोट्यवधी लिटर किरणोत्सर्गी पाणी कुठून आले?

बारा वर्षांपूर्वी 2011 मध्ये भूकंप आणि सुनामीमुळे फुकुशिमा अणु प्रकल्पात भीषण स्फोट झाला होता. तेव्हापासून तेथे 133 कोटी लिटर किरणोत्सर्गी पाणी साचले आहे.

न्यूयॉर्क टाइम्सच्या मते, 500 ऑलिम्पिक जलतरण तलावांच्या आकाराच्या तलावांत हे पाणी साठवण्यात आले आहे.

हे पाणी समुद्रात मिसळण्याची चर्चा जपानने करताच चीन आणि दक्षिण कोरियाचे लोक घाबरले आहेत.

Radioactive Water Fukushima.
Chandrayaan-3: "शर्मांचे नाव रोशन केले, वाह दीदी वाह", चंद्रयान 3 च्या वक्तव्यावरून ममता बॅनर्जी ट्रोल

चीनला कशाची भीती?

या पाण्यात 64 प्रकारचे किरणोत्सर्गी पदार्थ विरघळले आहेत. यामध्ये कार्बन-14, आयोडीन-131, सीझियम-137, स्ट्रॉन्टियम-90 कोबाल्ट, हायड्रोजन-3 आणि ट्रिटियम हे घटक मानवासाठी हानिकारक आहेत.

यापैकी बहुतेक किरणोत्सर्गी पदार्थांचे आयुष्य खूपच कमी असते. त्यामुळे त्यांचा प्रभाव संपला आहे. पण, कार्बन-14 सारखे काही पदार्थ आहेत ज्यांचा क्षय होण्यास 5000 वर्षे लागतात.

याव्यतिरिक्त, अणुभट्टीच्या पाण्यात ट्रिटियमचे कण अजूनही आहेत. त्यामुळे समुद्रातील अन्न म्हणजे मासे, खेकडा आणि सागरी प्राण्यांच्या माध्यमातून ते मानवी शरीरात पोहोचण्याची भीती चीन आणि दक्षिण कोरियाला आहे.

Radioactive Water Fukushima.
Yevgeny Prigozhin Dead: पुतीनविरुद्ध बंड करणाऱ्या वॅगनर प्रमुखाचा विमान दुर्घटनेत मृत्यू, घातपाताचा संशय

भारतालाही धोका?

समुद्रातून वाहणारे किरणोत्सर्गी पाणी हिंद महासागरातही पोहोचू शकते. मात्र, येथे पोहोचण्यासाठी किरणोत्सर्गी पाण्याला सुमारे 14 हजार किलोमीटरचे अंतर पार करावे लागणार आहे.

पाण्यात विरघळलेल्या विषारी घटकांचा प्रभाव या दरम्यान कमी होऊ शकतो कारण समुद्रात पाण्यात विरघळल्यानंतर त्याची तिव्रता थोडी कमी होईल.

पण यानंतरही त्याचा काही प्रमाणात प्रभाव कायम राहील. भारत सरकारने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com