Donald Trump Dainik Gomantak
ग्लोबल

Middle East Tension: मध्य पूर्वेत पुन्हा वाढला तणाव! ट्रम्प यांची इराणला खुली धमकी, तर पाकिस्तान मध्यस्थतेतून बाहेर?

Donald Trump Iran Nuclear Talks Warning 2026: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकीच्या सुरात इराणसोबत नव्याने चर्चा सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली.

Manish Jadhav

Donald Trump Iran Nuclear Talks Warning 2026: मध्य पूर्वेत इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष सुरु होऊन पाच महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला, तरी या गंभीर वादावर कोणताही ठोस तोडगा निघू शकलेला नाही. गेल्या महिन्यात अमेरिका आणि इराण दरम्यान पार पडलेल्या विविध टप्प्यांतील चर्चांनंतर परिस्थिती काही प्रमाणात सामान्य झाली होती, मात्र अचानक युद्धबंदी रद्द झाल्यामुळे दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटून आले.

अशातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकीच्या सुरात इराणसोबत नव्याने चर्चा सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली. जर तेहरानने या चर्चेला नकार दिला, तर येणारे दिवस त्यांच्यासाठी अधिक भयानक असतील, असा थेट इशाराच ट्रम्प यांनी दिला.

या संपूर्ण घडामोडींदरम्यान आंतरराष्ट्रीय राजकारणात एका नव्या चर्चेने उधाण आणले. युद्धाच्या पहिल्या दिवसापासून अमेरिका आणि इराणमध्ये मध्यस्थीची भूमिका बजावणारा पाकिस्तान आता या प्रक्रियेतून बाजूला झाला आहे का, असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच स्पष्ट केले की, इराणसोबत पुन्हा एकदा संवादाचे मार्ग खुले होत आहेत. या प्रयत्नांमध्ये सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि कतार या आखाती देशांचे योगदान सर्वात मोठे आहे, कारण याच देशांनी अमेरिकेला इराणशी चर्चा करण्यासाठी प्रोत्साहित केले.

मात्र, ट्रम्प यांनी थेट राजकीय चर्चेचा दावा फेटाळत, सध्या ही चर्चा केवळ होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेशी संबंधित असल्याचे स्पष्ट केले.

ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या नव्या मध्यस्थांच्या यादीत पाकिस्तानचा दुरान्वयानेही उल्लेख नाही. यामुळे शाहबाज शरीफ सरकारने मध्य पूर्वेतील या महासंकटातून स्वतःचे हात काढून घेतले आहेत का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. पाकिस्तान सुरुवातीपासूनच दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी पुढाकार घेत होता. मात्र, ट्रम्प यांच्या ताज्या वक्तव्यामध्ये पाकिस्तानचे (Pakistan) नाव पूर्णपणे गायब असल्याने पाकिस्तानने या मध्यस्थीतून माघार घेतल्याचे संकेत मिळत आहेत.

अर्थात, यावर अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसल्याने पाकिस्तान पूर्णपणे बाहेर पडला आहे असे ठामपणे सांगणे घाईचे ठरेल, तरीही जागतिक स्तरावर या बदलाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Two Wheeler Ban Porvorim: पर्वरी उड्डाणपुलावर दुचाकींना 'नो एंट्री'! अपघातानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये; 65 किमी वेगमर्यादा, रडार आणि सीसीटीव्हीचीही तयारी

Goa Crime: 5 लाखांची सुपारी, कॅसिनो संचालकावर गोळीबार! मुख्य शूटर उत्तर प्रदेशातून जेरबंद; नेपाळला पळून जाण्याच्या होता तयारीत

Harmanpreet Kaur Record: हरमनप्रीत कौरने रचला इतिहास! मिताली राजचा रेकॉर्ड मोडीत काढत बनली आशियातील यशस्वी कॅप्टन; भारताने 8व्यांदा जिंकली 'आशिया कप ट्रॉफी'

Goa Forward AAP Alliance: भाजप-काँग्रेसला पर्याय म्हणून 'गोवा फर्स्ट' मैदानात! सरदेसाई-केजरीवालांची आघाडी जाहीर; 2027च्या निवडणुकीसाठी नवे राजकीय समीकरण

अलेक्झांडर ज्वेरेव्हने रचला इतिहास! बेन शेल्टनला धूळ चारत जिंकले 'US Open 2026' चे विजेतेपद; बनला नवा चॅम्पियन

SCROLL FOR NEXT