US Israel Iran Conflict: इराण युद्धाच्या रणनीतीवरुन ट्रम्प-नेतान्याहू यांच्यात फोनवर कडाक्याचं भांडण; अमेरिकेच्या भूमिकेमुळे इस्रायल नाराज VIDEO

US Israel Iran Strategy Conflict: अमेरिका आणि इस्रायल या दोन मित्रदेशांमधील संबंधांमध्ये इराणसोबतच्या युद्धाच्या भविष्यावरुन मोठी दरी निर्माण झाल्याचे समोर आले.
US Israel Iran Strategy Conflict
Donald Trump Benjamin NetanyahuDainik Gomantak
Published on
Updated on

US Israel Iran Strategy Conflict: अमेरिका आणि इस्रायल या दोन मित्रदेशांमधील संबंधांमध्ये इराणसोबतच्या युद्धाच्या भविष्यावरुन मोठी दरी निर्माण झाल्याचे समोर आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यात झालेल्या एका फोन कॉल दरम्यान रणनीतीवरुन तीव्र मतभेद आणि गरमागरमी झाली.

अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, या संभाषणात दोन्ही नेत्यांमध्ये इराणविरुद्धच्या पुढील पाऊलांवरुन स्पष्ट मतभेद दिसून आले. अमेरिका सध्या इराणसोबत चर्चा आणि राजनैतिक तोडगा काढण्याच्या बाजूने दिसत असताना, इस्रायल मात्र इराणवर पुन्हा एकदा तीव्र लष्करी हल्ले सुरु करण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. या परस्परविरोधी भूमिकेमुळे दोन्ही जागतिक नेत्यांमध्ये तणाव कमालीचा वाढला आहे.

अमेरिकन मीडिया आउटलेट 'एक्झिओस' (Axios) ने दिलेल्या रिपोर्टनुसार, ट्रम्प यांच्याशी फोनवर प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू कमालीच्या संतापात होते. नेतान्याहू यांना इराणच्या लष्करी क्षमता पूर्णपणे कमकुवत करायच्या आहेत आणि तिथल्या पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करुन तेथील सरकारवर प्रचंड दबाव आणायचा आहे. यासाठी इस्रायलला इराणवर (Iran) पुन्हा मोठे हवाई हल्ले सुरु करायचे आहेत.

US Israel Iran Strategy Conflict
Donald Trump Iran Threat: 'लवकर निर्णय घ्या, अन्यथा काहीच उरणार नाही', ट्रम्प यांचा इराणला पुन्हा थेट आणि कडक इशारा; क्रूड ऑईलच्या किमतींमध्ये मोठी उसळी

दुसरीकडे, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रविवारीच स्पष्ट केले की, त्यांनी इराणवर मंगळवारी होणारे प्रस्तावित हल्ले तूर्तास पुढे ढकलले आहेत. कतार आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या अनेक अरब देशांच्या विशेष विनंतीवरुन ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला, जो इस्रायलला अजिबात पटलेला नाही.

US Israel Iran Strategy Conflict
Donald Trump: "मी राष्ट्राध्यक्ष व्हावं असं त्याला वाटत नव्हतं..." अल्पवयीन मुलींची तस्करी करणाऱ्या एपस्टीनसोबतच्या मैत्रीवर ट्रम्प बोलले

ट्रम्प यांच्या या नरमाईच्या धोरणामुळे इस्रायली नेतृत्व अत्यंत निराश आणि चिंतेत आहे. सूत्रांच्या हवाल्याने समोर आलेल्या माहितीनुसार, कतार आणि पाकिस्तानने इतर प्रादेशिक मध्यस्थांच्या मदतीने एक नवीन 'शांतता प्रस्ताव' तयार केला. या प्रस्तावाचा मुख्य हेतू अमेरिका आणि इराणमधील वाद कमी करणे हा आहे. मात्र, इराण हा केवळ चर्चेच्या नावाखाली वेळकाढूपणा करत असून ट्रम्प त्यांना तशी संधी देत असल्याचा इस्रायलचा आरोप आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प अजूनही इराणसोबत एका कराराची शक्यता पडताळून पाहत आहेत. परंतु, जर चर्चा यशस्वी झाली नाही, तर लष्करी कारवाईचा पर्याय पुन्हा खुला केला जाईल, असेही अमेरिकेने म्हटले.

या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी नेतान्याहू यांच्याबाबत एक मोठे आणि खळबळजनक वक्तव्य केले. ट्रम्प म्हणाले की, इराणला एकतर शांतता कराराच्या दस्तऐवजावर स्वाक्षरी करावी लागेल किंवा मग अमेरिका स्वतः पुढे होऊन हा संपूर्ण विषय कायमचा संपवेल. सध्या करार आणि युद्ध दोन्ही गोष्टी अंतिम टप्प्यात असल्याचे ट्रम्प यांनी मान्य केले.

US Israel Iran Strategy Conflict
Donald Trump: युद्धाच्या सावटात ट्रम्प यांचं 'थँक्यू' मिशन! 800 कैद्यांची फाशी रोखल्यानं अमेरिकेच्या भूमिकेत मोठा बदल; इराणवरील हल्ल्याच्या चर्चेला फाटा

विशेष म्हणजे, इराणच्या मुद्द्यावर बेंजामिन नेतान्याहू हे "मी जे सांगेन, तेच करतील," असा दावा ट्रम्प यांनी केला असून आपल्यात अजूनही चांगले संबंध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, इराणने अमेरिकेकडून (America) मिळालेल्या सुधारित प्रस्तावावर विचार करत असल्याची पुष्टी केली असली, तरी त्यांनी आपल्या भूमिकेत मवाळपणा आणण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. त्यामुळे या भागातील युद्धाचे ढग अजूनही गडद आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com