Iran Attack US Military Base: मिडल ईस्टमध्ये युद्धाचा भडका! इराणचा जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी बेसवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला; 'पॅट्रियट' सिस्टीम फेल

Iran Attack US Military Base In Jordan: मिडल ईस्ट म्हणजेच मध्य पूर्वेतून एक अत्यंत धक्कादायक आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाला हादरवून टाकणारी बातमी समोर आली.
Iran Attack US Military Base In Jordan
Iran Attack US MilitaryDainik Gomantak
Published on
Updated on

Iran Attack US Military Base In Jordan: मिडल ईस्ट म्हणजेच मध्य पूर्वेतून एक अत्यंत धक्कादायक आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाला हादरवून टाकणारी बातमी समोर आली. इराणने जॉर्डनमध्ये असलेल्या अमेरिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि धोरणात्मकदृष्ट्या संवेदनशील लष्करी ठिकाणावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला केला. या अंगावर काटा आणणाऱ्या हल्ल्यात अनेक अमेरिकन सैनिक गंभीररीत्या जखमी झाल्याचे वृत्त असून लष्करी तळाचे मोठे नुकसान झाले.

या संपूर्ण घटनेत सर्वात जास्त थक्क करणारी बाब म्हणजे, अमेरिकन लष्कराची सर्वात विश्वसनीय मानली जाणारी 'पॅट्रियट एअर डिफेन्स सिस्टीम' आणि तिचे इंटरसेप्टर्स इराणी क्षेपणास्त्रांना हवेतच रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. अमेरिकेच्या अत्याधुनिक संरक्षण यंत्रणेचे हे अपयश जागतिक पातळीवर चर्चेचा विषय बनले.

Iran Attack US Military Base In Jordan
Iran Israel War: युद्धामुळे बदललेली वैश्विक समीकरणे

जॉर्डनमध्ये ज्या अमेरिकन बेसला लक्ष्य करण्यात आले, ते कोणतेही सामान्य ठिकाण नाही. हा लष्करी तळ संपूर्ण मिडल ईस्टमध्ये आंतरराष्ट्रीय लष्करी मोहिमांचे मुख्य केंद्र मानला जातो. येथून अमेरिकेसह त्याचे नाटो मित्रदेश मोठ्या प्रमाणावर आपले ऑपरेशन्स चालवतात. धोरणात्मकदृष्ट्या हा तळ जॉर्डनची राजधानी अम्मानपासून पूर्व दिशेला सुमारे 100 किलोमीटर अंतरावर स्थित असून, येथे अमेरिकेची प्रचंड मोठी आणि आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध आहे. प्राथमिक माहितीनुसार, इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स'ने (IRGC) या बेसवर एकाच वेळी अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि आत्मघाती ड्रोनचा वर्षाव केला.

Iran Attack US Military Base In Jordan
America Attack Iran: अमेरिकेचा इराणवर 24 तासांत दुसरा हल्ला; होर्मुझ सामुद्रधुनीजवळील लष्करी ठिकाणं उद्ध्वस्त VIDEO

या हल्ल्याचा वेग आणि तंत्रज्ञान इतके अचूक होते की, अमेरिकन तळावर तैनात असलेली पॅट्रियट इंटरसेप्टर क्षेपणास्त्रे त्यांना हवेत नष्ट करु शकली नाहीत आणि क्षेपणास्त्रे थेट बेसच्या आत जाऊन कोसळली. सोशल मीडियावरही या अपयशी इंटरसेप्शनचे आणि जमिनीवर झालेल्या भीषण स्फोटांचे व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत. इराणने या हल्ल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, अमेरिकन लष्कराने इराणच्या किनारी भागात केलेल्या बॉम्बहल्ल्यांना हे चोख प्रत्युत्तर आहे. या हल्ल्यामुळे जॉर्डनसोबतच कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकन ठिकाणांना हाय अलर्ट जारी करण्यात आला.

Iran Attack US Military Base In Jordan
New Iran Supreme Leader: इराणचे नवे बॉस मोजतबा खामेनेई जिवंत! पडद्यामागून हलवतायेत सूत्रे; अमेरिकन परराष्ट्र मंत्र्याचा मोठा खुलासा

पॅट्रियट डिफेन्स सिस्टीमचा अशा प्रकारे पराभव होणे हा अमेरिकेसाठी (America) खूप मोठा धक्का मानला जात असून, आता या भागात पूर्ण क्षमतेने महायुद्ध भडकण्याची भीती संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com