Islamic Nato Defense Pact Pakistan Saudi Turkey Dainik Gomantak
ग्लोबल

‘इस्लामिक NATO’ ची घोषणा! सौदीनंतर आता तुर्कीलाही पाकड्यांकडून अण्वस्त्र कवच; मुस्लिम जगतातील मोठी लष्करी आघाडी

Islamic Nato Defense Pact Pakistan Saudi Turkey: पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्की या तीन प्रमुख मुस्लिम देशांनी एका ऐतिहासिक संरक्षण करारावर स्वाक्षरी केली.

Manish Jadhav

Islamic Nato Defense Pact Pakistan Saudi Turkey: जागतिक राजकारणाला कलाटणी देणारी एक अत्यंत मोठी घडामोड समोर आली. पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्की या तीन प्रमुख मुस्लिम देशांनी एका ऐतिहासिक संरक्षण करारावर स्वाक्षरी केली. या नव्या करारानुसार, तिन्हींपैकी कोणत्याही एका देशावर झालेला सशस्त्र हल्ला हा तिन्ही देशांवर झालेला हल्ला मानला जाईल आणि त्याला एकत्रितपणे प्रत्युत्तर दिले जाईल.

सौदी अरेबियातील मक्का शहरात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोआन आणि सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी संयुक्तपणे या महाआघाडीची घोषणा केली. या अत्यंत महत्त्वाच्या करारादरम्यान पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर हे साक्षीदार म्हणून उपस्थित होते. माध्यमांच्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी पाकिस्तान आणि सौदीमध्ये असा द्विपक्षीय करार झाला होता, मात्र आता यात तुर्कीचाही समावेश करण्यात आल्याने या आघाडीचे सामर्थ्य कित्येक पटीने वाढले. जागतिक संरक्षण तज्ज्ञ या नवीन त्रिपक्षीय युतीला 'इस्लामिक नाटो' म्हणून संबोधत आहेत.

या करारानंतर तिन्ही देशांनी एक संयुक्त निवेदन जारी केले असून, इस्लामिक एकता आणि प्रादेशिक सुरक्षा मजबूत ठेवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आल्याचे म्हटले. या करारांतर्गत तिन्ही देश संरक्षण सहकार्याचे सर्व पैलू अधिक दृढ करण्यासाठी एकत्रितपणे काम करणार आहेत. या संरक्षण आघाडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, या करारामुळे आता तुर्कीलाही अप्रत्यक्षपणे 'परमाणु छत्री' (Nuclear Umbrella) लाभली आहे.

तसेच, भविष्यात इतर मुस्लिम देशांनाही या युतीमध्ये सामील करुन घेण्याची तरतूद या करारात ठेवण्यात आली. या संपूर्ण आघाडीच्या केंद्रस्थानी पाकिस्तान आहे, कारण सध्याच्या घडीला अण्वस्त्रे असणारा पाकिस्तान हा एकमेव मुस्लिम देश आहे. दुसरीकडे, सौदी अरेबियाकडे 60 अब्ज डॉलर्सचे प्रचंड मोठे संरक्षण बजेट असून आर्थिक बाजू मजबूत ठेवण्यात त्याची भूमिका मोलाची ठरणार आहे.

या नवीन 'इस्लामिक नाटो'मुळे जगातील अनेक देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता असून, काही विशिष्ट देशांसाठी हा करार थेट धोका मानला जात आहे. सौदी अरेबियाचा विचार केला तर मध्य पूर्वेतील इराण, येमेन आणि युएई हे त्याचे पारंपारिक प्रतिस्पर्धी आहेत, त्यातच येमेनचे हूती बंडखोर सातत्याने सौदीवर हल्ले करत असतात.

तुर्कीच्या दृष्टीने ग्रीस, सायप्रस आणि इस्रायल हे त्याचे शत्रू मानले जातात; विशेषतः इस्रायलच्या बड्या नेत्यांनी आपले पुढील लक्ष्य तुर्की असू शकते असे संकेत दिले आहेत. तर पाकिस्तान (Pakistan) हा भारत आणि अफगाणिस्तानला आपले शत्रू मानतो. या तिन्ही देशांच्या सीमांवर आणि भौगोलिक राजकारणावर या कराराचा थेट परिणाम होणार असल्याने, आगामी काळात जागतिक संरक्षणाच्या दृष्टीने या त्रिकुटाची पावले अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'चा जबर दणका! पाक एअरफोर्सचा एअरबेस अजूनही कोमात; सॅटेलाइट कॅमेऱ्यानं पकडली पाकड्यांची चोरी

CCTV Mandatory in medical: औषध दुकानांवर आता सीसीटीव्हीची नजर! H, H-1 आणि X औषधांच्या विक्रीवर नियंत्रणासाठी केंद्राचा मोठा प्रस्ताव

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्गावर अपघात, पाणी साचण्याच्या समस्येवर 'आप'चा हल्लाबोल

Adam Zampa Record: कांगारुचा नवा 'किंग ऑफ स्पिन'! ॲडम झाम्पा ठरला ऑस्ट्रेलियाचा नंबर 1 स्पिनर; शेन वॉर्नचा मोडला मोठा रेकॉर्ड

Iron Ore Mining Goa: कोडली खाणीला पर्यावरणीय मंजुरीपूर्वी मोठी सुनावणी; 377 हेक्टर क्षेत्रात 35 लाख टन लोहखनिज उत्खननाचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT