Pakistan: बलुचिस्तानमध्ये रक्ताची होळी! पाकिस्तानी कोस्ट गार्डच्या कॅम्पवर आत्मघाती हल्ला; 30 हून अधिक जवान ठार VIDEO

BLA Suicide Attack Gwadar Pakistan Coast Guard: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर आली.
BLA Suicide Attack Gwadar Pakistan Coast Guard
BLA Suicide Attack Gwadar Pakistan Coast GuardDainik Gomantak
Published on
Updated on

BLA Suicide Attack Gwadar Pakistan Coast Guard: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर आली. बलुचिस्तानमधील ग्वादर जिल्ह्यातील जिवानी येथील पनवान भागात असलेल्या 'पाकिस्तान कोस्ट गार्ड'च्या एका मोठ्या छावणीवर शुक्रवारी संध्याकाळी भीषण आत्मघाती हल्ला करण्यात आला. या हल्ल्याची जबाबदारी प्रतिबंधित फुटीरतावादी संघटना 'बलुच लिबरेशन आर्मी' म्हणजेच बीएलए (BLA) ने घेतली. संघटनेने दावा केला की, या भीषण आणि नियोजनबद्ध हल्ल्यात पाकिस्तान कोस्ट गार्डचे 30 हून अधिक जवान जागीच ठार झाले असून, अनेक जण गंभीर जखमी झाले.

'द बलुचिस्तान पोस्ट'च्या वृत्तानुसार, हा आत्मघाती हल्ला त्यांच्या विशेष पथकातील 'मजीद ब्रिगेड'ने घडवून आणला. अताउल्लाह बलोच उर्फ अजमल नावाच्या आत्मघाती हल्लेखोराने शुक्रवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास स्फोटकांनी भरलेला एक माजदा ट्रक थेट कोस्ट गार्डच्या तटबंदी असलेल्या किल्ल्यासारख्या कॅम्पमध्ये घुसवला. हा ट्रक आत शिरताच अत्यंत भीषण आणि कानठळ्या बसवणारा स्फोट झाला.

BLA Suicide Attack Gwadar Pakistan Coast Guard
Pakistan Army: भारताला पाकिस्तान लष्करी जवानही घाबरले; सैन्यात मोठा असंतोष, हजारो जवानांचा राजीनामा

या हल्ल्याची तीव्रता दाखवणारा एक 43 सेकंदांचा व्हिडिओ देखील बीएलएच्या मीडिया विंग 'हक्काल'ने जारी केला, ज्यामध्ये स्फोटकांनी भरलेला ट्रक कॅम्पमध्ये जाताना आणि त्यानंतर मोठा स्फोट होऊन संपूर्ण परिसर धुराच्या लोळात हरवून जाताना दिसत आहे. या स्फोटात कॅम्पचा एक मोठा हिस्सा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा दावा करण्यात आला.

बीएलएचे प्रवक्ते जीयंद बलोच यांनी दिलेल्या निवेदनानुसार, ट्रकमधील स्फोटानंतर लगेचच त्यांच्या विशेष लढाऊ पथक असलेल्या 'फतेह स्क्वाड'ने अत्यंत संघटित आणि वेगाने पुढे सरकत संपूर्ण कॅम्पला चारही बाजूंनी घेरले आणि उर्वरित पाकिस्तानी सैनिकांवर जवळून थेट हल्ला चढवला. या दुहेरी कारवाईत 30 हून अधिक पाकिस्तानी जवान मारले गेले. बलुचिस्तानला जोपर्यंत पूर्ण स्वातंत्र्य मिळत नाही, तोपर्यंत पाकिस्तानी सुरक्षा दलांविरुद्ध अशीच तीव्र सशस्त्र ऑपरेशन सुरु राहील, असा इशाराही संघटनेने दिला.

BLA Suicide Attack Gwadar Pakistan Coast Guard
Attack On Pakistan Army: बलुचिस्तानमध्ये दहशतवाद्यांच्या टार्गेटवर पाकिस्तानी लष्कर; हल्ल्यात 12 जवान ठार

दरम्यान, या भीषण हल्ल्याबाबत आणि त्यात झालेल्या जीवितहानी किंवा नुकसानाबाबत पाकिस्तान लष्कर अथवा तिथल्या सरकारी अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा पुष्टी दिलेली नाही. त्यामुळे बीएलएच्या या दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी होऊ शकलेली नाही, तरीही या घटनेने पाकिस्तान सुरक्षा यंत्रणेत मोठी खळबळ उडाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com