narcotic  Dainik Gomantak
ग्लोबल

अमली पदार्थांच्या तस्करीचा पर्दाफाश, पाकिस्तानचा मोठा अधिकारी गजाआड

Pakistan: पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे भारतीय हद्दीत अमली पदार्थांची तस्करी होत आहे. ज्याचा व्हिडिओ देखील अलिकडेच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Manish Jadhav

Pakistan: पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे भारतीय हद्दीत अमली पदार्थांची तस्करी होत आहे. ज्याचा व्हिडिओ देखील अलिकडेच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

विशेष म्हणजे, हा पहिला व्हिडिओ होता ज्यात पाकिस्तानी तस्कर भारतीय हद्दीत ड्रग्जची पाकिटे टाकत होता.

परंतु पाकिस्तानच्या अंमली पदार्थ विरोधी दलाने (एएनएफ) बुधवारी या अंमली पदार्थांच्या तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आणि लाहोर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी शाखेचे प्रमुख तस्करीत गुंतल्याचे सांगितले.

दरम्यान, गेल्या आठवड्यात पाकिस्तान (Pakistan) रेंजर्सनी दावा केला होता की त्यांनी पाकिस्तानमध्ये ड्रग्ज, शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पाकिस्तानच्या हद्दीत सहा भारतीय नागरिकांना अटक केली आहे.

गुरमीत सिंग, शिंदर सिंग, जुगिंदर सिंग आणि विशाल जग्गा अशी चार कथित तस्कर भारतातील फिरोजपूर येथील आहेत. रतन पाल सिंग हा जालंधरचा तर गरवेंद्र सिंग हा लुधियानाचा आहे.

पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाहोर पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी शाखेचा प्रमुख मजहर इक्बाल याच्यावर ड्रोनद्वारे भारतात ड्रग्ज, विशेषत: हेरॉइनची तस्करी केल्याचा आरोप आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, इक्बालने तस्करीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावले असून नुकत्याच अटक करण्यात आलेल्या भारतीय तस्करांच्या जबाबाच्या आधारे त्याच्यावर कारवाई सुरु करण्यात आली आहे.

दुसरीकडे, लाहोर पोलिसांच्या (Police) अमली पदार्थ विरोधी शाखेचे प्रमुख मजहर इक्बाल यांच्या विरोधात ड्रोनद्वारे सीमा ओलांडून (भारत) अमली पदार्थांची तस्करी केल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

त्याची चौकशी सुरु असून, त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पंजाब पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ड्रग्जच्या बेकायदेशीर सीमापार तस्करीच्या तपासाची व्याप्ती आणखी वाढवण्यासाठी आम्ही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची उच्चाधिकार समिती स्थापन केली आहे.

प्राथमिक तपासानुसार, इक्बाल हा अनेक वर्षांपासून सीमापार तस्करीत गुंतला होता हे काही उच्च पोलीस अधिकाऱ्यांना माहीत होते, परंतु त्याने त्यांना गप्प केले. अधिकाऱ्याने सांगितले की, सहा भारतीय नागरिकांच्या अटकेनंतर या प्रकरणाची उच्च पातळीवर चर्चा झाली.

त्यानंतर इक्बालवर कारवाई सुरु करण्यात आली. पोलिसांनी लाहोरमधील नेटवर्कच्या इतर सदस्यांनाही अटक करणे अपेक्षित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT