Suicide over electricity bill in Pakistan, people on the streets against the government:
सध्या पाकिस्तानी नागरिक वाढीव वीजबिलांमुळे चिंतेत आहेत. या विरोधात सध्या संपूर्ण पाकिस्तानात आंदोलने सुरू आहेत.
दरम्यान, पाकिस्तानी चलनातील ४० हजार रुपये वीज बिल भरण्यासाठी पैसे नसल्याने एका व्यक्तीने आत्महत्या केली, ही या आठवड्यात अशी दुसरी घटना आहे, असे पाकिस्तानी माध्यमांनी बुधवारी सांगितले.
पंजाब प्रांतातील डिजकोट शहरातील मुहम्मद हमजा (३५) याच्या कुटुंबाने पोलिसांना सांगितले की आर्थिक अडचणींमुळे तो आधीच नैराश्यात होता आणि जास्त वीज बिलामुळे त्याने हे कठोर पाऊल उचलले.
बिल भरू न शकल्याने या व्यक्तीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. मृत व्यक्ती हा दोन अल्पवयीन मुलांचा बाप होता. डिजकोट पोलिसांनी सांगितले की, या पूर्ण घटनेची सत्यता पाडतळण्यासाठी तपास केला जाईल.
यापूर्वी मंगळवारी द एक्सप्रेस ट्रिब्यूनने बातमी दिली होती की पंजाब प्रांतातील एका महिलेने 10 हजार रुपयांचे बिल भरूनही तिच्या घरी वीज न जोडल्याने आत्महत्या केली.
पीडितेच्या पतीच्या म्हणण्यानुसार, त्याने बिल भरण्यासाठी घरातील वस्तू विकल्या होत्या आणि कर्ज घेतले होते, परंतु मुलतान इलेक्ट्रिक पॉवर कंपनीने (MEPCO) बिल भरुनही वीज पुन्हा जोडली नाही.
काळजीवाहू सरकार नागरिकांसाठी कोणतीही मदत करण्यास तयार नाही त्यामुळे या दुःखद घटना घडत असल्याचे, पाकिस्तानातील लोक म्हणत आहेत.
काळजीवाहू पंतप्रधान अन्वारुल हक ककर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मंजुरी दिल्याशिवाय वीजबिल हप्त्यांमध्ये विभागण्यात येणार नसल्याचे सांगितले.
दरम्यान, वीजबिलांबाबत देशव्यापी आंदोलन पाचव्या दिवशीही सुरू असून, नागरिकांनी रस्त्यावर उतरून, रस्ते अडवून त्यांची बिले पेटवून दिली आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.