FATF Dainik Gomantak
ग्लोबल

FATF Meeting: 'एफएटीएफ'च्या ग्रे यादीतून पाकिस्तान बाहेर पडणार?

संघटनेच्या बैठकीस पॅरिसमध्ये प्रारंभ; दहशतवादास वित्त पुरवठ्यावरून टाकलेले या यादीत

गोमन्तक डिजिटल टीम

FATF Meeting: फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे फायनॅन्शियल अॅक्शन टास्क फोर्स म्हणजेच FATF या संघटनेच्या महत्वाच्या बैठकीला सुरवात झाली आहे. 206 सदस्य असलेल्या या संघटनेने दहशतवादास वित्त पुरवठ्यावरून पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकले आहे. या बैठकीनंतर पाकिस्ताना या या यादीतून बाहेर पडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पाकिस्तानचे नवनिर्वाचित अर्थमंत्री इशाक दार हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असून नुकतेच त्यांनी एफएटीएफच्या ग्रे यादीतून बाहेर पडण्यासाठीचे सर्व निकष पाकिस्तानने पुर्ण केल्याचे म्हटले होते.

FATF चे अध्यक्षपद दोन वर्षांसाठी सिंगापुरकडे आहे. २०६ सदस्य असलेल्या या संघटनेत जागतिक नाणेनिधी, संयुक्त राष्ट्रे, जागितक बँक, इंटरपोल आणि फायनॅन्शियल इंटेलिजन्स यूनिटचाही समावेश आहे.

पाकिस्तानला जून 2018 मध्ये संघटनेने ग्रे यादीत टाकले होते. मनी लाँड्रिंग, टेरर फंडिंग आणि कमकुवत कायदे बनविणअयावरून संघटनेने ही कारवाई केली होती. FATF च्या या कारवाईने पाकिस्तानला जगभरातून मिळणाऱ्या निधीवर निर्बंध आले होते.

पाकिस्तानने दावा केला आहे की, यंदाच्या बैठकीत ते ग्रे यादीतून बाहेर येतील. कारण संघटनेच्या 40 पैकी 38 निकष पुर्ण केले आहेत. उर्वरीत दोनवरही अंमल करण्याचा विश्वास पाकिस्तानने संघटनेकडे व्यक्त केला होता.

दरम्यान, पाकिस्तानमधील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी एफएटीएफ संघटनेच्या १५ सदस्यीय शिष्टमंडळाने २९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या काळात पाकिस्तानचा गुप्त दौरा केला होता. हा दौरा यशस्वी ठरल्याचे नंतर प्रसारमाध्यमांना सांगण्यात आले होते. या काळात टेरर फंडिंगचा आढावा घेतला गेला होता. आता पाकिस्तानला या ग्रे यादीत ठेवायचे की त्यातून बाहेर काढायचे, याचा निर्णय या बैठकीत होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 6 स्टार खेळाडूंना डच्चू, कोहली- बुमराहचं कमबॅक

Monsoon Update: पावसाची चाहूल; 22 आणि 23 जूनला अनेक भागांत पावसाचा अंदाज, यलो अलर्ट जारी

Land Fraud Case: अंबेशी येथील जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक, जमीनमालकाची वाळपई पोलिसांत तक्रार दाखल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3% वाढीची शक्यता; पगारवाढ कधीपासून लागू होणार?

Karapur Mega Project: कारापूर प्रकल्प विरोधातील आंदोलन तापण्याची शक्यता, पायवाटांवरून पुढे केलेल्या अटी ग्रामस्थांना अमान्य

SCROLL FOR NEXT