UK PM Liz Truss
UK PM Liz TrussDainik Gomantak

Liz Truss Resigns: ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी दिला राजीनामा

Prime Minister of the United Kingdom: ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी राजीनामा दिला आहे.

Prime Minister of the United Kingdom: ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या 45 दिवसांनी राजीनामा दिला आहे. सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याचा राजीनामा आणि संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील सदस्यांकडून तीव्र टीका झाल्यानंतर ट्रस यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ट्रस यांनी डाउनिंग स्ट्रीटवरील एका निवेदनात आपल्या भविष्याबद्दल सुरु असलेल्या अटकळींदरम्यान राजीनामा जाहीर केला.

यानंतर, अर्थमंत्री बदलण्याव्यतिरिक्त, ट्रस यांना त्यांची अनेक धोरणे मागे घ्यावी लागली. तसेच त्यांच्या कार्यकाळात सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षात अनुशासनहीनता होती. ट्रस यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा, असे अनेक कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते सांगत होते. मात्र प्रदीर्घ दबावानंतर ट्रस पदावरुन पायउतार झाल्या. यापूर्वी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार सायमन होरे म्हणाले होते की, 'सरकार (Government) अस्थिर झाले आहे.'

UK PM Liz Truss
Britain New PM: लिझ ट्रस ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान - आज घेणार शपथ

दुसरीकडे, क्रॅसिंस्की क्वार्टेंग यांची गेल्या शुक्रवारी मंत्रिमंडळातून (Cabinet) हकालपट्टी करण्यात आली होती. त्यातच त्यांचे उत्तराधिकारी अर्थमंत्री जेरेमी हंट यांनी सोमवारी सरकारच्या मिनी बजेटमध्ये कपात केली होती. या निर्णयामुळे ट्रस यांच्या नेतृत्वासाठी संकट आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती.

UK PM Liz Truss
Liz Truss UK PM: कोण आहेत लिझ ट्रस; जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास

तसेच, ब्रिटनमधील (Britain) लोक आणि कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते लिझ ट्रसच्या कामावर खूश नव्हते. डेली मेलच्या अहवालानुसार, YouGov ने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले होते की, कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या पाच पैकी चार कार्यकर्त्यांना वाटते की पंतप्रधान काम करत नाही. तर 55 टक्के लोकांना वाटते की, त्यांनी पंतप्रधान पद सोडले पाहिजे. शिवाय, केवळ 38 टक्के लोकांना त्यांनी पंतप्रधान पदावर रहावे असे वाटते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com