China Against India In UN: लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेच्या शाहिद महमूद याला जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करण्याच्या भारताच्या प्रयत्नांत चिनने खोडा घातला आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारत आणि अमेरिकेने तसा प्रस्ताव आणला होता. या प्रस्तावाला चीनने विरोध दर्शविला.
दरम्यान चीनने अशाप्रकारे विरोध दर्शविण्याची ही चौथी वेळ आहे. चिनने यापुर्वीही पाकिस्तानी दहशतवाद्यांना पाठबळ दिले आहे. या आधी जैश ए मोहम्मदचा कमांडर अब्दुल रऊफ, दहशतवादी रहमान मक्की आणि जैश ए मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझहर यांना जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला चिनने यापुर्वी विरोध केला होता.
कोण आहे शाहिद महमूद?
अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाच्या मते, दहशतवादी महमूद हा लष्कर ए तोयबाचा म्होरक्या आहे. पाकिस्तानातील कराचीतून चालणाऱ्या या संघटनेशी महमूद 2007 पासून जोडला गेलेला आहे. जून 2015 ते जून 2016 पर्यंत लष्कर ए तोयबाला वित्तपुरवठा करणाऱ्या फलाह ए इन्सानियत चा उपाध्यक्ष देखील महमूदच होता. 2014 मध्ये तो या एफआयएफ संघटनेचा मुख्य बनला. ऑगस्ट 2013 मध्ये तो लष्कर ए तोयबाच्या पब्लिकेशन विंगचा सदस्य होता.
पाच राष्ट्रांकडे नकाराधिकाराची ताकद
एखाद्याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्राची सुरक्षा परिषद घेते. सुरक्षा परिषदेत अमेरिका, चीन, फ्रान्स, रशिया आणि ब्रिटन हे कायमस्वरूपी तर १० अस्थायी सदस्य आहेत. सर्व स्थायी सदस्यांच्या सहमतीनंतरच एखाद्या व्यक्तीला जागतिक दहशतवादी घोषित करता येऊ शकते. या देशांना व्हेटो पॉवर म्हणजे नकाराधिकाराची ताकद असते.
जागतिक दहशतवादी घोषित झाल्यावर काय होते?
या यादीत नाव आल्यावर तीन प्रकारच्या कारवाई होतात. या दहशतवाद्याची कुठल्याही देशातील संपत्ती जप्त करण्याचे अधिकार सरकारला प्राप्त होतात. जेणेकरून त्या व्यक्तीची आर्थिक रसद थांबावी. या दहशतवाद्याच्या प्रवासावर निर्बंध येतात. कोणताही देश या दहशतवाद्यास देशात प्रवेश देत नाही. ज्या देशात हा दहशतवादी असेल तिथे त्याच्या प्रवासावर निर्बंध येतात. या व्यक्तीला कुठलेही शस्त्र मिळू नये, अशी व्यवस्था केली जाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.