Pakistan Bomb Blast Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Bomb Blast: पाकिस्तान पुन्हा रक्ताळला! खैबर पख्तूनख्वामध्ये भीषण बॉम्बस्फोट; 8 ठार, 35 हून अधिक जखमी VIDEO

Pakistan Suicide Bomb Blast: पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील लक्की मारवत जिल्ह्यात मंगळवारी (12 मे) एका भीषण आत्मघाती बॉम्बस्फोटाने संपूर्ण परिसर हादरुन गेला.

Manish Jadhav

Pakistan Suicide Bomb Blast: पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील लक्की मारवत जिल्ह्यात मंगळवारी (12 मे) एका भीषण आत्मघाती बॉम्बस्फोटाने संपूर्ण परिसर हादरुन गेला. या आत्मघाती हल्ल्यात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असून 35 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हा हल्ला इतका भीषण होता की, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका आत्मघाती हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेला रिक्षा नौरंग बाजारच्या फाटक चौकात उडवून दिला. या स्फोटात ठार झालेल्यांमध्ये दोन सुरक्षा अधिकारी आणि एका महिलेचाही समावेश आहे.

स्फोटाची तीव्रता प्रचंड असल्यामुळे नौरंग बाजार परिसरात मोठी घबराट पसरली. स्फोटानंतर तातडीने मदत कार्य सुरु करण्यात आले. जखमींना तात्काळ सराय नौरंग येथील तहसील मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बन्नू आणि पेशावरमधील मोठ्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले. रेस्क्यू 1122 चे प्रवक्ते शाहदाब खान यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका आणि बचाव पथके घटनास्थळी रवाना करण्यात आली.

या भीषण घटनेनंतर संबंधित भागातील सर्व रुग्णालयांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली. रजेवर असलेल्या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आणि डॉक्टरांना तातडीने कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून स्थानिक नागरिकांनाही मदतीचे आवाहन करण्यात आले. नौरंग बाजारच्या या चौकात नेहमीच वर्दळ असते, त्यामुळे या आत्मघाती हल्ल्यात सर्वसामान्यांचे मोठे नुकसान झाले.

खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री मोहम्मद सुहैल अफरीदी यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी पोलीस महानिरीक्षकांना या प्रकरणाचा तपास करुन सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री अफरीदी यांनी शोक व्यक्त करताना म्हटले की, "आम्ही या कठीण काळात मृतांच्या नातेवाईकांसोबत आहोत. प्रांतीय सरकार पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करेल." या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही, मात्र सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण लक्की मारवत जिल्ह्याची नाकेबंदी करुन हल्लेखोरांच्या साथीदारांचा शोध सुरु केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lanka Vesak Festival Accident: श्रीलंकेत बौद्ध उत्सवादरम्यान भीषण अपघात, मद्यधुंद पिकअप चालकानं गर्दीला चिरडलं; 6 भाविकांचा मृत्यू तर 13 गंभीर जखमी

Bicholim Sports Ground: मोडलेली फाटके अन् कोसळणारे खांब! डिचोलीच्या ऐतिहासिक मैदानाचा खेळखंडोबा; खेळाडू धोक्यात

Gajlakshm Rajyog 2026: कुबेराचा खजिना रिता होणार, रातोरात चमकणार भाग्य! 'गजलक्ष्मी योग' 4 राशींना बनवणार करोडपती; गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम काळ

दक्षिणेतील मोर्चेबांधणी आणि काँग्रेसपुढील आव्हाने

Goa Monsoon: पावसाळापूर्व तयारी केवळ बैठकांपुरतीच

SCROLL FOR NEXT