पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वामध्ये पावसाचा हाहाकार! 23 बालकांसह 45 जणांचा मृत्यू; 105 जणांच्या आयुष्याची राखरांगोळी

Pakistan Rain Disaster 45 Dead: उत्तर-पश्चिम पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतात गेल्या 10 दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने प्रचंड हाहाकार माजवला.
Weather Report of Pakistan
Pakistan Rain DisasterDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Rain Disaster 45 Dead : उत्तर-पश्चिम पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतात गेल्या 10 दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने प्रचंड हाहाकार माजवला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, पावसाशी संबंधित विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत किमान 45 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 105 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.

मृतांच्या आकड्यामध्ये लहान मुलांची संख्या सर्वाधिक असणे ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. या नैसर्गिक आपत्तीत मृत्यू पावलेल्या 45 व्यक्तींपैकी 23 लहान मुले, 17 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश आहे, तर जखमींमध्ये 45 पुरुष, 16 महिला आणि 44 मुलांचा समावेश असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.

Weather Report of Pakistan
Pakistan Economic Crisis: आर्थिक त्सुनामीनं पाकड्यांच्या उडाल्या चिंधड्या! युएईनं 2 अब्ज डॉलर्सचं कर्ज मागितलं परत; पाकिस्तानच्या खजिन्याला पडलं खिंडार

25 मार्चपासून सुरु असलेल्या या संततधार पावसामुळे प्रांतातील दोन डझनहून अधिक जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी घरांची छपरे आणि भिंती कोसळल्याने नागरिक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. सरकारी अहवालानुसार, या पावसामुळे एकूण 442 घरांचे नुकसान झाले असून त्यापैकी 382 घरांची अंशतः पडझड झाली आहे, तर 60 घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. घरांचे नुकसान झाल्याने शेकडो कुटुंबे उघड्यावर आली असून प्रशासनाकडून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सध्या पीडीएमए, रेस्क्यू 1122 आणि जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर बचाव आणि मदत कार्य राबवत असून बाधित क्षेत्रातील ढिगारे उपसण्याचे काम सुरु आहे.

Weather Report of Pakistan
Pakistan IMF Bailout Package: भीक मागण्यात पाकिस्तान 'सुपरस्टार'! आता आयएमएफनं वाचवला पाकड्यांचा जीव; 1.2 अब्ज डॉलर्स मंजूर

पावसाचा (Rain) हा कहर इतक्यात थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत, कारण हवामान विभागाने 9 एप्रिलपर्यंत प्रांतातील अनेक भागांमध्ये पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर पीडीएमएच्या महासंचालकांनी धोक्याचा इशारा दिला असून पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना संवेदनशील किंवा डोंगराळ भागात अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले. दरडी कोसळण्याच्या शक्यतेमुळे सरकारी सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Weather Report of Pakistan
Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानच्या एअरस्ट्राईकनंतर अफगाणिस्तानचा पलटवार; 55 पाक सैनिक ठार, 19 चौक्यांवर तालिबानचा ताबा VIDEO

प्रशासकीय यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले असून आपत्तीग्रस्त भागात अन्नधान्य आणि वैद्यकीय मदत पोहोचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. पाकिस्तानमधील (Pakistan) या भीषण नैसर्गिक संकटामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही चिंता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com