देशाची आर्थिक स्थिती ढासळली तर त्या देशावर काय परिस्थिती ओढवते हे आपण, श्रीलंकेत (Srilanka Economic Crisis) पाहिले आहे. परकीय चलनाचा तुटवडा निर्माण झाल्याने श्रीलंका देशात अनेक संकटे निर्माण झाली आहेत. त्यापैकी महागाई आणि बेरोजगारी (Inflation and unemployment in Srilanka) या प्रमुख समस्या आहेत. पाकिस्तानची देखील आर्थिक स्थिती फार उत्तम आहे असे नाही. पाकिस्तान आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी मुख्य:त्वे चीन देशावर अवलंबून आहे. अशात पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल (Pakistan's Finance Minister Miftah Ismail) यांनी येत्या काळात पाकिस्तानवर 'बुरे दिन' येणार असल्याचे वक्तव्य केले आहे.
पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजच्या (Pakistan Stock Exchange) एका कार्यक्रमाला संबोधित करताना अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांनी आपले मत मांडले. माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) सरकारच्या खराब आर्थिक धोरणांमुळे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Prime Minister Shehbaz Sharif) यांचे सरकार कठीण काळातून जात आहे. असा आरोप इस्माईल यांनी केला.
इस्माईल म्हणाले, "पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (PLM-N) सरकारच्या कार्यकाळात देशाची वित्तीय तूट 1,600 अब्ज डॉलर होती. गेल्या चार वर्षांत, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) सरकारच्या काळात हा आकडा 3,500 दशलक्ष डॉलर एवढा झाला आहे. चालू खात्यातील तूट एवढी वाढली तर कोणताही देश वाढू शकत नाही, आणि स्थैर्यही निर्माण होऊ शकत नाही. येत्या तीन महिन्यात मी आयात वाढू देणार नाही. याचा विकासावर काही प्रमाणात परिणाम होईल पण दुसरा पर्याय नाही." असे इस्माईल म्हणाले.
"देशाला संभाव्य थकबाकीपासून वाचविण्यासाठी सरकारला प्रयत्न करावे लागतील. त्या दिशेने योग्य पावले उचलावी लागतील. आपण योग्य मार्गावर आहोत पण, आपल्याला वाईट दिवस पाहावे लागतील. जर आपण तीन महिने आयातीवर (Import) नियंत्रण ठेवले तर, आम्ही विविध मार्गांनी निर्यात (Export) वाढवू शकतो." असा विश्वास इस्माईल यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, गेल्या आर्थिक वर्षात पाकिस्तानने 80 अब्ज डॉलरची आयात केली होती तर, 31 अब्ज डॉलरची निर्यात केली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.