Pakistan flag  Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: कंगाल पाकिस्तानच्या संकटात आणखी वाढ; या कारणांमुळे 71 विमानांचे उड्डाण रद्द

दैनिक गोमन्तक

Pakistan: पाकिस्तानमध्ये गेल्या काही काळापासून सातत्याने राजकीय अस्थिरता दिसून येते तर कधी राजकीय अस्थिरता दिसून येते. आता पाकिस्तानला तेलाच्या तीव्र टंचाईमुळे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सला 81 पैकी 70 उड्डाणे रद्द करावी लागली आहेत.

पाकिस्तानच्या सरकारी तेल कंपनीने एक दिवस आधी सांगितले होते की त्यांना तेल पुरवठा करण्यासाठी $ 220 दशलक्ष पैसे मिळाल्याची माहीती सांगितली आहे. हे तेल पीआयएच्या ३९ विमानांना देण्यात येणार होते. दरम्यान त्यांना फक्त 4 विमानांसाठी तेल मिळाले असल्याची माहीती पीआयएने एक निवेदन जारी करून दिली आहे.

पीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, तेल न मिळाल्याने विमानांच्या उड्डाणांवर परिणाम होत आहे. तेल कंपनीकडून पैसे न मिळाल्याने पाकिस्तान सरकारने पुरवठा रद्द केल्यामुळे पीआयएची उड्डाणे सातत्याने रद्द होत आहेत.

पाकिस्तान सरकारला भारताच्या एअर इंडियाप्रमाणे PIA चे खाजगीकरण करायचे आहे. सध्या पीआयएचे मोठे नुकसान होत आहे आणि त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. PIA ने काळजीवाहू सरकारकडे 23 अब्ज रुपयांची मदत मागितली आहे जेणेकरुन विमान चालू ठेवता येईल.

यानंतर काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक काकर यांनी पीआयएच्या आर्थिक पुनर्रचना आणि स्थिरीकरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, 81 नियोजित उड्डाणेंपैकी रविवारी फक्त 11 उड्डाणे चालू शकली.

तेलाचे जास्तीचे पैसे सरकारी तेल कंपनीला देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. ते म्हणाले की, पैसे देऊनही आम्हाला तेल देण्यात आले नाही, त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात उड्डाणे बंद करावी लागली. सरकारी विमान कंपनी गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. आता पाकिस्तान( Pakistan )चे सरकार यावर कसा मार्ग काढणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT