Hottest Year: सर्व विक्रम मोडत 2023 ठरणार सगळ्यात उष्ण वर्ष; सप्टेंबर-ऑक्टोबरचा 'ही' आकडेवारी तुम्हालाही चक्रावून सोडेल

Hottest Year On Planet: या रेकॉर्डनुसार २०२३चा सप्टेंबर हा महिना सगळ्यात उष्ण महिना म्हणून रेकॉर्ड केला आहे.
Hottest Year
Hottest YearDainik Gomantak
Published on
Updated on

Hottest Year On Planet: सध्या ऑक्टोबर हीटमुळे नागरिक त्रासलेले दिसून येत आहेत. अनेकांना उष्माघाताचा त्रास होताना दिसत आहे. मात्र या वर्षातील सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याने एक रेकॉर्ड केला आहे.

हा सलग चौथा महिना आहे, ज्या महिन्यात सगळ्यात जास्त तापमान नोंदवले गेले आहे. युरोपियन युनियनच्या कोपर्निकस हवामान बदल सेवेने केलेल्या अभ्यासानुसार ही माहीती समोर आली आहे. २०२३ हे रेकॉर्ड इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष ठरु शकते असेही या अभ्यासात नोंदवले आहे.

युरोपियन युनियनच्या कोपर्निकस हवामान बदल या संस्थेने 1940 मध्ये रेकॉर्ड ठेवण्यास सुरुवात केली आहे. या रेकॉर्डनुसार २०२३चा सप्टेंबर हा महिना सगळ्यात उष्ण महिना म्हणून रेकॉर्ड केला आहे.

कोपर्निकसच्या उपसंचालक समंथा बर्गेस यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, विक्रमी उन्हाळ्यानंतर, सप्टेंबरमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, या तापमानाने वर्षभरातील विक्रम मोडले आहेत.

सप्टेंबरमध्ये सरासरी जागतिक हवेचे तापमान १६.३८ अंश सेल्सिअस होते. हा महिना 1991 ते 2020 पर्यंतच्या सरासरीपेक्षा 0.93 अंश सेल्सिअस जास्त उष्ण होता. औद्योगिक युगाच्या आधी, जेव्हा जगाने मोठ्या प्रमाणात जीवाश्म इंधने जाळण्यास सुरुवात केली तेव्हा सरासरी सप्टेंबरच्या तुलनेत ते 1.75 अंश सेल्सिअस जास्त आहे.

तापमान वाढण्याची काय आहेत कारणे?

या वर्षी म्हणजेच २०२३च्या सप्टेंबरमध्ये लिबिया आणि ग्रीस, बल्गेरिया आणि तुर्कीमध्ये विनाशकारी पूर आला ज्यात हजारो लोकांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, कॅनडा( Canada )च्या जंगलातील आगीने तांडव केला होता आणि दक्षिण अमेरिकेतील काही भागात विक्रमी उष्णता दिसत होती. दरम्यान, विक्रमी पावसामुळे न्यूयॉर्कमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.

सीएनएनने दिलेल्या माहीतीनुसार सप्टेंबरमध्ये समुद्राच्या तापमानानेही विक्रम मोडला आहे. समुद्राच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान 20.92 अंश सेल्सिअसवर पोहोचले, जे सप्टेंबरच्या इतिहासातील सर्वोच्च आणि या वर्षी ऑगस्ट( August )नंतरच्या कोणत्याही महिन्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च तापमान आहे.

Hottest Year
भारतविरोधी दहशतवादी कारवाया करणाऱ्या Dawood Malik ची गोळ्या झाडून हत्या

अंटार्क्टिकमधील समुद्रातील बर्फ

अंटार्क्टिकमधील समुद्रातील बर्फ देखील या वर्षी विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. या विक्रमी घटनांमुळे, यूएस नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन नुसार 2023 हे रेकॉर्ड केलेल्या इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष असण्याची शक्यता 93 टक्क्यांहून अधिक असल्याची शक्यता नोंदवली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com