New Year 2024 Voting in 64 countries India and America: 2024 हे वर्ष अनेक अर्थांनी खूप खास असणार आहे. अशा अनेक गोष्टी या वर्षात घडणार आहेत, ज्या मागील वर्षांमध्ये एकत्र कधीच घडल्या नव्हत्या. हे वर्ष भारतातील रेल्वे, सामाजिक समस्या, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि अवकाश यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. राजकारणाच्या दृष्टिकोनातून हे वर्ष महत्त्वाचे आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या वर्षी भारतासह जगातील अनेक देशांमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. 2024 मध्ये जगातील जवळपास निम्मी लोकसंख्या मतदान करणार आहे. अनेक देशांमध्ये सरकारे बदलू शकतात.
दरम्यान, सध्या जगाची एकूण लोकसंख्या 8 अब्ज आहे, त्यापैकी 4 अब्ज (400 कोटी) लोक यावर्षी मतदान करतील. यावर्षी एकूण 64 देशांमध्ये निवडणुका होणार आहेत. इतर देशांतील सरकार स्थापनेमुळे त्यांच्या परराष्ट्र धोरणावरही परिणाम होईल. त्यामुळे देशांमधील संबंधही नव्याने बदलू शकतात. या वर्षी ज्या देशांमध्ये निवडणुका होणार आहेत त्यात तैवान, रशिया, भारत, अमेरिका, ब्रिटन, युरोपियन युनियन, इंडोनेशिया, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, व्हेनेझुएला या देशांचा समावेश आहे. यंदा जवळपास संपूर्ण युरोपमध्ये निवडणुका होणार आहेत. आशिया खंडातील अनेक देशांमध्येही निवडणुका होणार आहेत.
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका आणि जगातील सर्वात जुनी लोकशाही असलेल्या अमेरिकेत होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका या सर्वात महत्त्वाच्या आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यावेळी निवडणूक लढवतात की नाही आणि त्यांनी निवडणूक लढवली तर ते राष्ट्राध्यक्ष होतात की नाही हे पाहणे बाकी आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा व्हाईट हाऊसकडे लागल्या आहेत, कारण अमेरिकेच्या निवडणुकीचा संपूर्ण जगावर परिणाम होणार आहे.
दुसरीकडे, तैवानची निवडणूकही खूप महत्त्वाची आहे कारण तिथल्या निवडणुकांमध्ये चीनचा हस्तक्षेप असल्याच्या बातम्या येत आहेत. चीन तैवानला आपला भाग मानून त्यावर लष्करी दबाव वाढवत आहे. तैवानला आपल्या ताब्यात आणण्यासाठी चीन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तैवानच्या निवडणुकीवर जगाची नजर असेल. कंबोडियातही निवडणुका होऊ शकतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.