China: चीनमध्ये भूकंपानंतर आता कोळशाच्या खाणीत मोठी दुर्घटना, 12 जणांचा मृत्यू; 13 जण जखमी

China Coal Mine Accident: चीनमधील भूकंपाचा कहर अजून थांबलेला नसताना आणखी एका अपघाताने अनेकांचे प्राण घेतले.
China Coal Mine Accident
China Coal Mine AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

China Coal Mine Accident: चीनमधील भूकंपाचा कहर अजून थांबलेला नसताना आणखी एका अपघाताने अनेकांचे प्राण घेतले. चीनमधील कोळसा खाणीत झालेल्या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. चीनच्या हेलोंगजियांग प्रांतातील कोळसा खाणीत ही घटना घडली. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

सरकारी चायना सेंट्रल टेलिव्हिजनने एका वृत्तात म्हटले आहे की, बुधवारी दुपारी हेंगशान जिल्ह्यातील कुन्युआन कोळसा खाणीत हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या 13 जणांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपास पथक तयार करण्यात आले आहे. चीनमध्ये खाणीचे अपघात सामान्य आहेत, परंतु अलिकडच्या वर्षांत मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. चीन हा कोळशाचा सर्वात मोठा उत्पादक आणि वापरकर्ता आहे.

China Coal Mine Accident
China Beijing Metro Accident: बीजिंगमध्ये 2 मेट्रोंची जोरदार टक्कर, सुमारे 500 लोक जखमी!

चीनमध्ये वादळाचा तडाखा सुरुच आहे

सध्या चीनमध्ये नैसर्गिक आपत्तींनी कहर केला आहे. आधी महामारी, नंतर दुष्काळ आणि पूर आणि नंतर भूकंपाने हजारो लोकांचे प्राण घेतले आणि आता असे अपघात मृत्यूचे कारण ठरत आहेत. त्यामुळे चीनला धक्क्यावर धक्के बसत आहेत. यावर्षी चीनमध्ये भीषण पूर आणि दुष्काळामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या भूकंपात 134 जणांचा मृत्यू झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com