Masood Ilyas kashmiri  Dainik Gomantk
ग्लोबल

आयएसआयसोबत बैठक अन् 22 दहशतवाद्यांची यादी! ऑपरेशन सिंदूरनंतर आता नवा खुलासा; POK मधील तळांबाबत जैश कमांडरची जाहीर कबुली

Masood Ilyas kashmiri statement Pok Unrest Pakistan: पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे जाळे सक्रिय असल्याची कबुली खुद्द या संघटनेचा कमांडर मसूद इलियास कश्मीरी याने दिली.

Manish Jadhav

Masood Ilyas kashmiri statement Pok Unrest Pakistan: पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे जाळे सक्रिय असल्याची कबुली खुद्द या संघटनेचा कमांडर मसूद इलियास कश्मीरी याने दिली. इस्लामाबाद येथे आयोजित 'पुंछ अवाम संमेलनात' जाहीर व्यासपीठावरुन बोलताना त्याने हा खळबळजनक खुलासा केला. केवळ दहशतवादी तळांची कबुलीच नव्हे, तर पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या अधिकाऱ्यांसोबत आपली बैठक झाल्याचे आणि त्यांनी आपल्याला 22 संशयित दहशतवाद्यांची यादी सोपवल्याचेही त्याने मान्य केले.

या विधानामुळे पाकिस्तानच्या (Pakistan) भूमीवरुन चालणाऱ्या दहशतवादाचा बुरखा पुन्हा एकदा जगासमोर फाटला. मसूद इलियासने आपल्या भाषणात रावलाकोट येथे जैशचे सशस्त्र दहशतवादी तैनात असल्याचे सांगितले. याशिवाय पुंछ जिल्ह्यातील धर्मसाल परिसरात संघटनेचे मुख्य केंद्र म्हणजेच 'मरकज' कार्यरत असल्याची कबुलीही त्याने दिली.

इस्लामाबादमधील या बैठकीत पाकिस्तानी सरकार आणि सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी त्याला एक डॉक्युमेंट दिले होते, ज्यात रावलाकोट येथील आंदोलनात सहभागी असलेल्या 22 जणांची नावे होती. हे सर्व जण जैशशी संबंधित असल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. मात्र, हे लोक आपल्या संघटनेचे सदस्य नसून, भारतात घुसखोरी आणि हल्ले करण्यासाठी तयार केलेले जैशचे दहशतवादी स्थानिक आंदोलनात सहभागी नाहीत, असा दावा इलियासने केला.

गेल्या सुमारे साडेपाच महिन्यांपासून पाकव्याप्त काश्मीरमध्ये 'जॉइंट अवामी ॲक्शन कमिटी'च्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिक आपल्या हक्कांसाठी पाकिस्तान सरकारविरोधात तीव्र आंदोलन करत आहेत. या आंदोलनादरम्यान सुरक्षा दले आणि आंदोलकांमध्ये अनेकदा चकमकी झाल्या असून काही जणांचा मृत्यूही झाला. या तणावाच्या पार्श्वभूमीवर आपण स्वतः हस्तक्षेप करुन आंदोलनकर्त्या नेत्यांशी पाच वेळा चर्चा केल्याचे इलियासने सांगितले.

विशेष म्हणजे, तिथे चर्चेसाठी जाणाऱ्या राजकीय नेत्यांच्या शिष्टमंडळाला जैश-ए-मोहम्मद स्वतः सुरक्षा पुरवेल, अशी धक्कादायक ऑफरही त्याने दिली. सप्टेंबर 2025 मध्ये भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतरही मसूद इलियास चर्चेत आला होता, जेव्हा त्याने बहावलपूर येथील जैशच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात संघटनेचे मोठे नुकसान झाल्याचे कबूल केले होते. आता इस्लामाबादमधील त्याच्या या नव्या कबुलीजबाबाने पाकिस्तान सरकार, गुप्तचर यंत्रणा आणि दहशतवादी संघटनांमधील छुपी युती पुन्हा एकदा उघड केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Keralam School Shooting: मित्रांना बंदूक दाखवण्याचा नाद बेतला जीवावर! अचानक सुटलेल्या गोळीत नववीतील विद्यार्थी जखमी; केरळमधील थरकाप उडवणारा प्रकार

'16 डिसेंबरपर्यंत भारत बांगलादेश ताब्यात घेईल'; पश्चिम बंगालच्या मंत्र्यांचा मोठा दावा, हिंदूंच्या हत्यांचा बदला घेण्याचा इशारा

T20 Cricket: हातातला विजय गोव्याने गमावला! अखेरच्या षटकात फेलिक्सची गोलंदाजी महागात, छत्तीसगडचा विजय

Delhi Crime: ज्या सहकाऱ्यांसोबत पार्टी केली, तेच बनले सैतान! दिल्लीतील कॅफेत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार; दोघांना अटक अन् तिघांचा शोध सुरु

School Without Walls: मोबाईलच्या दुनियेत हरवली बिनभिंतीची शाळा; निसर्गाकडून शिकण्याची संधीच कमी झाली!

SCROLL FOR NEXT