

Kulgam Encounter Jammu and Kashmir: दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील लारु भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. यामध्ये कुलगाम परिसरातील लष्कराचा शेवटचा सक्रिय कमांडर लतीफ भट याचाही समावेश आहे. सीआरपीएफच्या पथकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर गेल्या सहा दिवसांपासून सुरक्षा दलांचे सर्च ऑपरेशन या भागात सुरु होते, ज्याला मोठे यश आले.
बुधवारी (11 नोव्हेंबर) कुलगाममधील अखरान गावात मोटारसायकलवरुन आलेल्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर अचानक हल्ला केला. दहशतवाद्यांनी अवघ्या 15 सेकंदांत तब्बल 30 राऊंड गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान गंभीर जखमी झाले होते. हल्ल्यानंतर दहशतवादी घटनास्थळावरुन फरार झाले होते. या घटनेची गंभीर दखल घेत सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराची नाकाबंदी करत संयुक्त शोध मोहीम तीव्र केली होती. सलग सहाव्या दिवशीही लारु परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी घेरुन त्यांचा खात्मा केला.
या चकमकीत मारला गेलेला लतीफ भट हा दक्षिण काश्मीरमधील लष्कर-ए-तैयबाचा अत्यंत महत्त्वाचा आणि शेवटचा सक्रिय कमांडर मानला जात होता. त्याच्या खात्म्यामुळे परिसरातील दहशतवादी नेटवर्कला मोठा धक्का बसला. सुरक्षा दलांनी संपूर्ण भागात अजूनही कडक पहारा ठेवून सर्च ऑपरेशन सुरु ठेवले. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून विशेष सतर्कता बाळगण्यात येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.