Israel–Hamas war  Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: हमास, हिजबुल्लाह आणि हौथीच्या हल्ल्याने इस्रायलच्या वाढल्या अडचणी, गाझामध्ये ग्राउंड ऑपरेशन तीव्र

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या महिन्याभरापासून युद्ध सुरु आहे.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या महिन्याभरापासून युद्ध सुरु आहे. एकीकडे इस्रायलची लढाऊ विमाने गाझामध्ये बॉम्बचा वर्षाव करत आहेत, तर दुसरीकडे इस्रायली सैन्य हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा करत आहे. या युद्धाच्या एका बाजूला इस्रायल आहे, जो उघडपणे आपल्यावरील हल्ल्याचा बदला घेत आहे.

तर दुसरीकडे, हमास ही दहशतवादी संघटना आहे, ज्यांच्यासोबत लेबनॉनची दहशतवादी संघटना हिजबुल्लाह आणि येमेनची हौथी संघटना लढत आहे. हमास गाझा पट्टीतून हल्ले करत आहे. तर हिजबुल्लाहने लेबनीज भूमीतून तेल अवीवच्या दिशेने हल्ले तीव्र केले आहेत. त्याचवेळी, हौथी दहशतवादी संघटनाही क्षेपणास्त्र डागत आहे.

दरम्यान, इस्रायलसोबतच्या (Israel) या युद्धात हमासला पाठिंबा देण्यासाठी हिजबुल्लाह पहिल्यांदाच खुलेपणाने मैदानात आला आहे. त्याने लेबनॉनमधून हल्ले तीव्र केले. शनिवारी हिजबुल्लाहने इस्रायलच्या दिशेने टँकविरोधी क्षेपणास्त्रे डागली आणि त्याची जबाबदारीही घेतली.

एवढेच नाही तर हिजबुल्लाहने नवीन क्षेपणास्त्रांचाही वापर केला आहे. तर दुसरीकडे, इस्रायली लष्करानेही हिजबुल्लाच्या प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे.

इस्रायल संरक्षण दलाच्या सैनिकांनी हिजबुल्लाहच्या रॉकेट डेपोवर प्रत्युत्तरादाखल हल्ला केला. त्याच्या लष्करी परिसराला लक्ष्य करण्यात आले. दोनच दिवसांपूर्वी हिजबुल्लाहचा प्रमुख नसरल्लाहने हमासचे उघड समर्थन केले होते.

हिजबुल्लाह इस्रायलला आपला शत्रू मानतो

हमासला पाठिंबा देणारा हिजबुल्लाही इस्रायलला आपला शत्रू मानतो. त्याला इराणचाही पाठिंबा आहे. त्याच्याकडे घातक रॉकेट आणि इतर अत्याधुनिक शस्त्रेही आहेत. लेबनॉनच्या काही भागांवरही हिजबुल्लाचे नियंत्रण आहे.

येमेनची दहशतवादी (Terrorist) संघटना हौथी हमासचा दुसरा विश्वासू मित्र बनला आहे. युद्धाच्या 26 व्या दिवशी हौथीचा संघर्षात प्रवेश झाला. येमेनच्या हौथी बंडखोरांनी दावा केला आहे की, त्यांनी बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने इस्रायलवर हल्ला केला.

यासोबतच हल्ल्याची छायाचित्रेही प्रसिद्ध करण्यात आली आहेत. क्षेपणास्त्र डागण्यापूर्वी हौथी दहशतवाद्यांनी इस्रायल आणि अमेरिकेविरोधात घोषणाबाजीही केली.

येमेनच्या हौथींनी इस्रायलवर तीनदा हल्ले केले आहेत

दरम्यान, 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या भ्याड हल्ल्यापासून, हौथींनी इस्रायलवर तीन वेळा हल्ले केले आहेत. पहिला हल्ला 19 ऑक्टोबर रोजी झाला होता. दुसरा हल्ला 26 ऑक्टोबरला करण्यात आला. यावेळीही इस्रायलने लाल समुद्रात आपला हल्ला हाणून पाडला.

तिसरा हल्ला 31 ऑक्टोबरला झाला. हौथींनी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्याचा दावा केला आहे, जो इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेने नष्ट केला आहे. येमेन ते इस्रायल हे अंतर 2200 किमी आहे. यानंतरही हौथी बंडखोर इस्रायलला लक्ष्य करत आहेत. इस्रायलनेही या तिघांच्या विरोधात तयारी केली आहे.

हमास, हिजबुल्लाह आणि हौथी यांच्या संयुक्त हल्ल्यांमुळे चिंता वाढली

हमास, हिजबुल्ला आणि हौथी यांच्या संयुक्त हल्ल्यांमुळे इस्रायलच्या अडचणी नक्कीच वाढल्या आहेत, तरीही इस्रायली सैन्य थांबलेले नाही आणि झुकले नाही. आव्हाने स्वीकारुन आयडीएफचे सैनिक चोख प्रत्युत्तर देत आहेत. इस्रायली सैन्य आणि त्यांचे रणगाडे कहर करत आहेत.

शत्रूला चोख प्रत्युत्तर देत आहे. 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायली हवाई दलाने कमान संभाळली. त्यांच्या लढाऊ विमानांनी गाझा नष्ट करण्याचा चंग बांधला आहे. आता जमिनीवरही युद्ध तीव्र झाले आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्रीही गाझाला पोहोचले असून तिथे ते आपल्या सैनिकांना प्रोत्साहन देत आहेत.

20 हमास कमांडर आणि 1000 हून अधिक दहशतवादी मारले गेले

दुसरीकडे, या 30 दिवसांत इस्रायलने हमासचे कंबरडे मोडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. दोन्ही बाजूंनी सुमारे 11 हजार लोकांचा जीव गेला आहे. हजारो लोक जखमी झाले आहेत. एकट्या गाझामध्ये सुमारे 9500 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 1000 हून अधिक दहशतवाद्यांचाही समावेश आहे.

जवळपास 20 हमास कमांडरही मारले गेले आहेत. मोठ्या प्रमाणात दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. इस्रायली सैन्याने दहशतवाद्यांचे ऑपरेशनल हेडक्वार्टर, लॉन्चिंग पॅड, प्रशिक्षण शिबिरे आणि शस्त्रास्त्रांच्या गोदामांना निशाणा बनवले. आता ज्या ठिकाणी दहशतवादी लपल्याचे पुरावे सापडत आहेत त्या ठिकाणांना लक्ष्य केले जात आहे.

लेबनॉनच्या हिजबुल्लाबद्दल जाणून घ्या...

हिजबुल्ला ही शिया दहशतवादी संघटना आहे. 1975 ते 1990 पर्यंत चाललेल्या लेबनॉनमधील गृहयुद्धादरम्यान ती अस्तित्वात आली. इराण या दहशतवादी संघटनेला आर्थिक सहाय्य पुरवतो. इराण हा शिया मुस्लिमांचा देश आहे. या दहशतवादी संघटनेची स्थापना इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने 1982 मध्ये केली होती.

इराणमधील इस्लामिक क्रांतीचा इतर देशांमध्ये प्रसार करणे आणि लेबनॉनमध्ये इस्रायली सैन्याविरुद्ध मोर्चा उघडणे हा त्याचा उद्देश होता. आता ही संघटना दक्षिण लेबनॉनच्या काही भागांवर राज्य करते. यावरही बंदी आहे. आपल्या संघटनेत एक लाखाहून अधिक लढवय्ये असल्याचा हिजबुल्लाचा दावा आहे.

येमेनच्या हौथींबद्दल जाणून घ्या...

येमेनच्या उत्तरेकडील भागातील शिया मुस्लिमांची ही सर्वात मोठी दहशतवादी संघटना असून 1980 च्या दशकात हौथीचा उदय झाला. 2014 मध्ये हौथींनी येमेनची राजधानी साना ताब्यात घेतली. हौथी सरकारला इराणचा पाठिंबा आहे. त्याला पैसे आणि शस्त्रेही पुरवतो.

हमास आणि इस्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धात या दहशतवादी संघटनेचे लढवय्ये लाल समुद्रातून इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागत आहेत. पण प्रत्येक वेळी इस्रायल त्यांची क्षेपणास्त्रे हवेतच उधळून लावत आहे.

तो नष्ट करण्यासाठी इस्रायलने प्रथमच एरो डिफेन्स सिस्टमचा वापर केला आहे. एरो डिफेन्स सिस्टम हा इस्रायल आणि अमेरिका यांचा संयुक्त प्रकल्प आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हायकोर्टाने तयार केलेल्या सेवाशर्तीच्या नियमात बदल; गोवा सरकारचा बचाव करणाऱ्या मुख्य सचिवांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

Cash For Job Scam: 'प्रत्येकाला वाटतंय मीच CM, गोवा सरकारमध्ये सुरुय सर्कस, सगळे जोकर खेळतायेत'; LOP युरींची टीका

Ranji Trophy 2024: वाल्लोर! रणजीत गोव्याचा दमदार विजय; एक डाव, 551 धावांनी अरुणाचलवर मात

Goa CBI Raid: पणजीत लाच घेताना आयकर विभागाच्या अधिकाऱ्याला CBI नं रंगेहात पकडलं

Goa News: गोव्याच्या किनारी फोटोग्राफी भोवली, बिहारच्या तरुणाकडून 25 हजार दंड वसूल; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT