Turkey Recalls Ambassador From Israel: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच आता, इस्रायलला मोठा धक्का देत तुर्कीनेही आपल्या राजदूताला परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन तुर्की दौऱ्यावर असताना इस्रायलमधून राजदूत बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या महिन्यात इस्रायल-हमास युद्ध सुरु होईपर्यंत पॅलेस्टिनी मित्र तुर्की हळूहळू इस्रायलशी आपले तुटलेले संबंध पुन्हा प्रस्थापित करत होता.
पण जसजसे युद्ध वाढत गेले आणि गाझामधील मृतांची संख्या वाढली, तसतसे तुर्कीने इस्रायल आणि त्याच्या पाश्चात्य समर्थकांविरुद्ध आपला आवाज बुलंद करण्यास सुरुवात केली.
तुर्कीच्या (Turkey) परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, राजदूत साकीर ओझकान टोरुनलर यांना सल्लामसलत करण्यासाठी परत बोलवण्यात आले आहे. इस्रायलने युद्धविराम करण्यास नकार दिला आहे.
इस्रायली सैन्याने गाझामधील सर्वात मोठ्या शहराला वेढा घातला असून 7 ऑक्टोबरला इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचा बदला म्हणून हमासला चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत. तुर्कीपूर्वी बोलिव्हिया आणि जॉर्डननेही इस्रायलशी संबंध तोडले आहेत.
दुसरीकडे, इस्रायल-हमास युद्ध संपल्यानंतर गाझा स्वतंत्र, सार्वभौम पॅलेस्टिनी राज्याचा भाग असावा, असे तुर्कीचे अध्यक्ष तय्यिप एर्दोगन यांनी शनिवारी सांगितले. ते म्हणाले की, 'इतिहासातून पॅलेस्टिनींना हळूहळू पुसून टाकण्याच्या कोणत्याही योजनेला तुर्की पाठिंबा देणार नाही.'
तसेच, गाझामधील मानवतावादी संकटामुळे तुर्कीने इस्रायलवर जोरदार निशाणा साधला आहे. तुर्की देखील दोन राष्ट्राच्या मागणीचे समर्थन करतो. दुसरीकडे, तुर्की हमासच्या सदस्यांनाही आमंत्रित करतो. अमेरिका (America), ब्रिटन आणि इतर पाश्चात्य देशांप्रमाणे तुर्की हमासकडे दहशतवादी संघटना म्हणून पाहत नाही.
तुर्कीने तात्काळ युद्धबंदीचे आवाहन केले असून हमी देणारी यंत्रणा उभारण्याची ऑफर दिली आहे. शुक्रवारी कझाकिस्तानहून परतीच्या विमानात पत्रकारांशी बोलताना एर्दोगन यांनी इस्रायलला पाठिंबा दिल्याबद्दल पाश्चात्य देशांवर पुन्हा टीका केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.